मुंबई, दि. ५ : वर्धा
जिल्ह्यातील सेवाग्राम परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १६२.५१ कोटी
रुपयांचा सेवाग्राम विकास आराखडा राबविला जात आहे. या आराखड्याअंतर्गत विविध विकास
कामे करण्यासाठी २०१८-१९ या वित्तीय वर्षात २६ कोटी ८ लाख रुपयांचा निधी
अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यापैकी १८ कोटी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी
वर्धा यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती अर्थ व नियोजन मंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी दिली. या संबंधीचा शासननिर्णय
नियोजन विभागाने ४ जानेवारी २०१९ रोजी निर्गमित केला आहे.
घृष्णेश्वर, वेरुळसाठी ९
कोटी रुपयांचा निधी
ते पुढे म्हणाले की, श्रीक्षेत्र
घृष्णेश्वर, वेरुळ ता. खुलताबाद जि. औरंगाबाद विकास
आराखड्यासही शासनाने मान्यता दिली आहे. हा आराखडा ११२.४१ कोटी रुपयांचा आहे. या
आराखड्यातील सन २०१८-१९ या अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या १३ कोटी ७१ लाख
रुपयांच्या निधीपैकी ९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांना
उपलब्ध करून देण्यात आला आहे.
0 0 0
No comments:
Post a Comment