नागपूर, दि 2 :अन्न उत्पादक आणि अन्न परवानाधारकांनी ज्यांच्याकडे 25
किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशांनी प्रणालीच्या अंतर्गंत अन्न
सुरक्षेबाबत पर्यवेक्षक नेमणे अनिवार्य असल्याचे अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त श.
रा. केकरे यांनी सांगितले आहे.
अन्न सुरक्षा मानदे कायदा
2006 च्या कलम 16 (3)(एच)नुसार सर्व अन्न व्यवसाय परवानाधारकांनी सुरक्षेचे
प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानके
प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र ही प्रणाली मे
2017 पासून राबविण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे उत्पादक ते विक्रेतापर्यंत व
हॉटेल ते फेरीवाल्यापर्यंत येणाऱ्या सर्वांना परवानाधारक अन्न व्यवसायासाठी विविध
अभ्यासक्रम एफएसएसएएलद्वारे तयार करण्यात आला आहे.
भारतीय अन्न सुरक्षा व मानके
प्राधिकारण नवी दिल्ली यांच्या ऑक्टोबर 2017ला निर्गमित केलेल्या आदेशात सर्व
केंद्रीय व राज्य परवानाधारकांनी एक प्रशिक्षित अन्न व सुरक्षा पर्यवेक्षक नेमणे अनिवार्य
असल्याचे अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त श. रा. केकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले
आहे.
No comments:
Post a Comment