Thursday, 7 February 2019

‘जय महाराष्ट्र’ व ' दिलखुलास' मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह' या विषयावर मुलाखत


सहभाग : परिवहन आयुक्त शेखर चन्ने,
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर

         मुंबई, दि. ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्र'दिलखुलास'कार्यक्रमात परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर यांची 'रस्ता सुरक्षा सप्ताह' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे.तसेच राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून 'दिलखुलास' कार्यक्रमात शुक्रवार दि.८ व शनिवार दिनांक ९ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.  निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
      राज्यात दि. ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे, रस्ते अपघात होवु नयेत यासाठी पादचारी व्यक्ती विशेषत: करून लहान मुले व त्यांचे पालक यांनी घ्यायची खबरदारी, दुचाकी व चारचाकी वाहन चालकांनी वाहन चालवताना घ्यावयाची खबरदारी, मोबाईलवर बोलत असतानाही वाहन चालवत असल्यास कारवाई, रॅश ड्राईव्हींग, गोल्डन आवर ही संकल्पना, हायवेवर लेनची सुरक्षितता पाळणे, वाहनांचा तांत्रिक फिटनेस, हॉर्न नॉट ओके प्लीज अभियान याबाबतची सविस्तर माहिती श्री. चन्ने, श्री. कारगांवकर यांनी जय महाराष्ट्र'दिलखुलास'कार्यक्रमात दिली आहे.
000



No comments:

Post a Comment