Ø मस्कासाथ
येथे मटन-मासोळी मार्केटचे उद्घाटन
नागपूर, दि. 06 : नागरिकांना स्वच्छ वातावरणातील मटन व मासोळी मार्केट
शहरातच उपलब्ध झाल्यामुळे आता या आरोग्यदायी व पोषक वातावरणाचा सर्वांनाच फायदा
होईल. विकासामध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याची ग्वाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
मस्कासाथ येथील मटन व मासोळी मार्केटच्या बांधकामाचे
उद्घाटन व लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन
गडकरी होते तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, आमदार
विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपा आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर
प्रविण दटके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एका छताखाली
स्वच्छ वातावरणातील मटन व मासोळी मार्केटच्या दुमजली इमारतीचे उद्घाटन करतांना आज
मनस्वी आनंद होत आहे. नागरिकांच्या आरोग्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मटन व
मासोळी मार्केटची मागणी बरेच दिवसांपासून होती. जुन्या इमारतीच्या जागेवरच या मार्केटची स्थापना करण्यात आल्यामुळे
व्यावसायीकांनी नवीन जागेत स्थानांतरीत व्हावे. यामुळे कुणाचाही व्यवसाय बंद होणार
नाही तर नवीन व प्रशस्त जागेत व्यवसाय अधिक भरभराटीस येईल.
नव्या व्यावसायिक संकुलामुळे नागरिकांना देखील स्वच्छ
व पोषक वातावरण उपलब्ध होईल. व्यावसायीकांच्या गरजा विचारात घेवून व्यवस्था
करण्यात आली आहे. स्वच्छतेकरिता मुबलक
पाणी पुरवठा, खेळती हवा आणि प्रकाश राहील अशी व्यवस्था असल्याचे
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागपूरच्या केवळ पश्चिम भागाचाच विकास आणि सुधारणा
होत नसून पूर्व व मध्य नागपूरचा देखिल झपाट्याने विकास होत आहे. मटन व मासोळी
मार्केटचे दुकान - ओट्यांचे वाटप व व्यवस्थापन बाजार विभाग मनपा व विक्रेते
यांच्या समन्वयानी करण्यात येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.
खाटीक समाज युवामंचच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांचे भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
म्हणाले की, पूर्व, मध्य नागपूरसह सहा रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम करतांना
भूसंपादनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान कार्यक्रमाअंतर्गत 450 कोटी रुपयाचा विशेष निधी
उपलब्ध करुन दिला आहे. जुना भंडारा रोडचे रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होत
असून जागेची बाजारभावाने खरेदी करण्यात आली आहे. याअंतर्गत येणाऱ्या व्यवसायिकांना
पर्यायी रोडच्या कामालाही सुरुवात झाली असल्याचे श्री. नितीन गडकरी यांनी
सांगितले.
मटन व मासोळी मार्केट परिसरातील एकूण 48 मटन विक्रेते
व 32 मासोळी विक्रेते यांच्याकरिता अनुक्रमे इमारतीच्या तळमजल्यावर 48 दुकाने-ओटे
व पहिल्या मजल्यावर 32 दुकान-ओट्यांची रचना करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे संचालन
उपमहापौर दीपराज पार्डीकर तर आभार विनोद झाडे यांनी मानले.
यानंतर हज हाऊस मागील प्रस्तावित
जागेवर कुदळी चालवून डी.पी. रोडचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते करण्यात आले.
*****

No comments:
Post a Comment