* गितांजली चौक ते गांधीसागर
तलावाच्या डीपीरोडचे भूमीपूजन
* आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेडीमेड
गारमेंट झोन उभारणार
* गांधीसागर तलावाच्या
पुनर्विकासासाठीप्रस्ताव पाठवा
* भूखंड मालकी हक्कपट्टेवाटप
नागपूर दि. 6:विकास योजनांची अंमलबजावणी करताना सामान्य माणसाच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यामागची शासनाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
गितांजली चौक ते गांधीसागर तलावादरम्यानच्या डी.पी.रोडचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
रजवाडा पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. तर व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, आमदारडॉ. मिलिंद माने, आमदार विकास कुंभारे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगरयांची उपस्थिती होती.
नागपूर हे 21 व्या शतकातील बदलते शहर म्हणून उदयास येत असून,त्यासाठी शहराच्या विविध विकासकामांसाठी राज्य शासन आवश्यक ती मदत करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशभरासह राज्यात विविध क्षेत्रांमध्ये विकासकामे सुरु आहेत. या सर्व क्षेत्रांमधील विकासकामांमुळे बदलत्या भारताचे चित्र स्पष्ट होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकातील माणसाला लाभ मिळावा, असे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे, विकासाचा फायदा देशातल्या समाजातल्या सर्व घटकांना मिळत आहे. गरीबांना मालकी हक्क पट्टे वाटपही हाच दृष्टिकोन समोर ठेवूनच केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे राज्यात विविधरस्ते तसेच उड्डाणपूलाचे काम मोठ्या
वेगाने होत आहे. आज
डी.पी. रोडच्या कामाचेही भूमीपूजन
करण्यात आले असूनगांधीसागर तलावाच्या पुनर्विकासाच्या
कामाला आवश्यक
निधी राज्य शासनाकडून दिला जाईल. तसेच
ई लायब्ररीलाही मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
देताना ई-लायब्ररीचा प्रस्ताव शासनाकडे
तत्काळ पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी नागपूर महानगरपालिकेला केल्या.
गांधीसागर तलाव हा नागपूरचे वैभव असून, गांधीसागरच्या सौंदर्यांत भर
घालण्यासाठी आणि गांधीसागरचे पाणी शुध्दीकरण करण्यासाठी आवश्यक तो निधी राज्य शासन
देईल, सोबतचमहानगरपालिकेच्या शाळेची जागा
अटलई-लायब्ररी करण्यासाठी मान्यता देत
असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
नितीन गडकरी
मेयो
हॉस्पीटल ते भंडारा रोड रस्त्यासह आणखी एका रस्त्याचे भूसंपादनचे ही काम मंजूर
झाले आहे.रस्त्याच्या
विकासकामात नागरिकांचे घर जात असेल त्यांना बाजारभावाने मोबदला मिळेल.तसेच एम्प्रेस मिलच्या
बाजूच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेडीमेड गारमेंट झोन तयार करण्यात येणार आहे. या रेडीमेड गारमेंट झोनच्या माध्यमातून
स्थानिकांना रोजगार मिळणार असून, त्याबाबत ही रि-टेंडर करण्यात येणार असल्याचे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
शुक्रवारी
तलावाचे पाणी स्वच्छ करणे कठीण काम असले तरी पाणी शुध्द करण्याचे काम काम करण्यात
येईल. त्यासाठी
राज्य शासनाकडून आवश्यक तो निधी नक्कीच मिळेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच एम्प्रेस मिलची जागा
रेडीमेड गारमेंट झोनसाठी राखीव होती. त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेडीमेड गारमेंट
झोन उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिक महिलांना रोजगार मिळणार आहे. त्या रोजगारांच्या
माध्यमातून महिला स्वावलंबी होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी
व्यक्त केला.
यावेळी अब्दुल रज्जाक, शेख लाल, नूर
खान, मदार खान, व
जोहराबी नूर मदार खान, बल्लु
शेख शेख सुभान, सय्यद
खुर्शीद अली, रहमत अली, नजमा शेख रहीम, शेल
लतिफ, शेख बाबु शेख इब्राहीम, शेख बाबू, अहमद
खान, अब्दुल रहमान शेख रमजान, बेबी तब्बसुम, मोहमद
उसुफ, मोहमद रमजान आणि मदन सालिकराम वर्मा
यांना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या हस्ते भूखंड मालकी हक्क पट्टे वाटप करण्यात आले.
*****




No comments:
Post a Comment