Wednesday, 6 March 2019

होमगार्डच्या कर्तव्यभत्त्यात वाढ केल्याबद्दल गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार



मुंबई, दि. 6 : राज्यातील होमगार्डच्या कर्तव्यभत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीने घेतला. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी नॅशनल होमगार्ड पोलीस असोसिएशन समितीने गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन आभार मानले.
यावेळी होमगार्डस पोलीस असोसिएशनचे महासचिव नामदेव खाणझोडे यांच्यासह विदर्भ व मराठवाड्यातील होमगार्डस प्रतिनिधी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment