मुंबई, दि. : 6 डॉ. बाबासाहेब आंबेडकर परळच्या 'बीआयटी' चाळीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 50, 51 मध्ये राहत असत. याठिकाणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. विधानसभा अध्यक्ष श्री पटोले, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणी बुद्धवंदना घेण्यात आली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या खोल्यांमध्ये जाऊन तेथे जतन करण्यात आलेल्या वस्तू तसेच छायाचित्रांचीही माहिती घेतली. डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्यामुळे ही वास्तू एक महत्त्वाचे वारसास्थळ ठरली आहे.त्यामुळे ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
यावेळी मंत्री सुभाष देसाई, जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. आदित्य ठाकरे, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment