नागपूर,
दि. 16 : छत्तीसगड विधानसभेचे उपाध्यक्ष
मनोज सिंह मंडावी यांनी विधानसभा अध्यक्ष
नाना पटोले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना छत्तीसगढ येथे दिनांक 27 ते 29 डिसेंबर
2019 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय
आदिवासी नृत्य महोत्सवाचे निमंत्रण दिले. या नृत्य महोत्सवात विविध राज्य, केंद्रशासित प्रदेशातील कलाकार सहभागी होणार आहेत. चार
नृत्य प्रकारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. श्री. पटोले यांनी या
निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.
००००


No comments:
Post a Comment