नागपूर, दि. 16
: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज मुंबईहून विमानाने दुपारी
2.30 वाजता आगमन झाले. महापौर संदीप जोशी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत
केले.
विमानतळावर राज्यपालांचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार,
पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, नागपूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक के.
एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त
अभिजित बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती श्रीमती शीतल तेली-उगले आदी
अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
विमानतळावरील स्वागताचा स्वीकार करुन राज्यपाल भगत सिंह
कोश्यारी राजभवनकडे रवाना झाले. राज्यपाल यांचा शनिवार, दिनांक 21 डिसेंबर पर्यंत
राजभवन येथे मुक्काम आहे.
****
No comments:
Post a Comment