नागपूर दि. 12: डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत विकसित ई-फेरफार प्रणालीतील डाटा क्लिनिंग व व्हॅलिडिशेनचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी ते मंडळ अधिकारी यांच्यासाठी विभागीय स्तरावरील उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम उदया शुक्रवार, दिनांक 13 व 14 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या उजळणी प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन ई-फेरफार प्रकल्प , पुण्याचे राज्य समन्वयक रामदास जगताप करणार आहेत.
त्यानुसार नागपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्यातील संबंधित अधिकारी, निवडक कर्मचारी, तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकारी , तलाठी यांचे उद्या दिनांक 13 डिसेंबर रोजी तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यासाठी 14 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे अनुक्रमे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ई- फेरफार प्रणालीअंतर्गत ओडीसी, ओसीयु, एम. आय. एस., तसेच डी. एस. पी., डी.डी.एम. मॉडयुलमधील अचूक कामकाजाबाबत संबंधित जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, सूचना विज्ञान केंद्र अधिकारी, जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्स, तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी मंडळी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विभागस्तरीय उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त महसूल, नागपूर विभाग यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment