नागपूर,दि.6: सशस्त्र सेना ध्वजदिन-2019 निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहामध्ये उद्या दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांची प्रमुख उपस्थिती राहील.
संपूर्ण देशात 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसापासून ध्वजदिन निधी संकलीत करण्यात येवून शहीद सैनिकांच्या अवलंबितांच्या कुटुंबियांचे पुर्नवसन, माजी सैनिक आणि अपंग सैनिक यांच्या योग्य पुनर्वसनासाठी खर्च करण्यात येतो.
यावेळी माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांना प्रशस्तीपत्र तसेच धनादेश देवून गौरविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी लेफ्टनंट नितीन पांडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment