Friday, 6 December 2019

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘वादळवारा’ भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न

         




















नागपूर, दि. 6 : राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण  दिनाच्या पूर्वसंध्येला स्व. नीळकंठ लोखंडे स्मृती सभामंच, चंद्रमणीनगर येथे 'वादळवारा' हा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार मोहन मते यांनी  दीपप्रज्वलन केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी विस्तृत माहिती उपस्थित रसिकांना दिली. 
या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भीमगीते व भीमशाहिरीचे आयोजनदेखील करण्यात आले होते. यावेळी गायक अनिरुद्ध वनकर व त्यांचे सहकलाकारांनी भीमगीतांची सुंदर प्रस्तुती केली  आणि रसिकांनी भीमगीतांचा भरपूर आनंद घेतला.
यावेळी नगरसेवक श्रीमती लता कातगाय, किशोर गजभिये, पी. एस. खोब्रागडे, कार्यक्रम समन्वयक संदीप शेंडे, प्रकाश भाजे, भन्ते धम्मासारथी व अन्य रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंगेश मेश्राम तर आभारप्रदर्शन बादल श्रीरामे यांनी केले.
****

No comments:

Post a Comment