मुंबई, दि. 23 :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’
व ‘दिलखुलास’
कार्यक्रमात 'गरीब व गरजुंसाठी शिवभोजन योजना’
या विषयावर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक
संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची विशेष मुलाखत तसेच मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
मंत्री छगन भुजबळ यांचा शिवभोजन योजनेविषयीचा संदेश असलेली मुलाखत प्रसारित होणार
आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित
होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. २४ आणि सोमवार दि. 27 जानेवारी
रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली
आहे.
राज्यात २६ जानेवारीपासून शिवभोजन योजना
सुरू करण्यात येणार आहे. ही योजना नेमकी काय आहे, ही योजना सुरू करण्यामागचा
उद्देश, या योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण, या योजनेच्या अटी व शर्ती, प्रत्यक्षात ही थाळी किती
रुपयात उपलब्ध होणार, शिवभोजनालयाची निश्चित वेळ आदी
विषयांची माहिती श्री. पाठक यांनी 'दिलखुलास' व 'जय महाराष्ट्र' या
कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment