मुंबई, दि. 23 : विद्यापिठातील अधिकारी व
कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सकारात्मक असून लवकरच आढावा बैठक
घेण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय
सामंत यांनी दिले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत यांना
महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम यांच्यावतीने विविध मागण्यासंदर्भात
निवेदन देण्यात आले.
श्री.सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या
गुणवत्तेबरोबरच विद्यापिठातील अधिकारी-कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना
न्याय दिला पाहिजे. कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी, परीक्षा नियंत्रण (संचालक परीक्षा व मुल्यमापन) या पदावर नियुक्त
झालेल्या प्रशासकीय अधिकारी आणि प्राध्यापकांना समान ग्रेड पे देणे, समान वेतनश्रेणी असलेल्या समकक्ष अधिकाऱ्यांना 5 वर्षानंतर वेतनश्रेणीत
वाढ, प्रशाकीय अधिकाऱ्यांना वेतनश्रेणी व अन्य लाभ मिळणे, विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 102 नुसार निवड समितीत सुधारणा करणे,
कुलसचिव, संचालक (परीक्षा व मुल्यमापन) वित्त
व लेखा अधिकारी या पदावर विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियुक्त करणे या
विषयाच्या अनुषंगाने सर्वांची एकत्रित बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल.
000
No comments:
Post a Comment