मुंबई, दि. 24 : ज्याचे आजपर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले
नाही अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला महाराष्ट्र राज्य साहित्य
आणि संस्कृती मंडळातर्फे अनुदान देण्यात येते. यासाठी सन 2020 या वर्षासाठीच्या
अनुदानासाठी नवलेखकांनी येत्या 28
फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज पाठवावेत,
असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
संस्कृती मंडळाने केले आहे.
नवलेखकांना (1) कविता (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे - 80 कविता) (2) कथा
(128 ते 144 टाईप केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 45000 शब्द) (3) नाटक/एकांकिका (64 ते 96
टाईप केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 28000 शब्द) (4) कादंबरी
(128 ते 144 टाईप केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 45000 शब्द)
(5) बालवाङमय (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त
28000 शब्द) (6) वैचारिक लेख/ललितलेख/चरित्र/आत्मकथन/प्रवास वर्णन (128 ते 144
टाईप केलेली पृष्ठे – जास्तीत जास्त 45000 शब्द) या सहा
वाङमय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या
मर्यादेतील मुद्रित (टाईप) मजकुराला अनुदान देण्यात येईल. (वर उल्लेखिलेल्या किमान
पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त
पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास या
मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही).
नवलेखकांनी आपले अप्रकाशित साहित्य
मुद्रित स्वरुपात पाठवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. नवलेखकांनी त्यांचे साहित्य दि.27
जानेवारी 2020 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालवधीत पुढील पत्त्यावर पाठवावे. सचिव,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र
नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी
रोड, प्रभादेवी, मुंबई 400025.
दूरध्वनी : 022-24325931
या योजनेसाठीचे
माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या अंतर्गत नवलेखक अनुदान
योजना 2020 माहितीपत्रक व अर्ज या शीर्षकाखाली तसेच What’s New या अंतर्गत Navlekhaka Grant Scheme Rules Book and Application Form या शीर्षकाखाली तसेच मंडळाच्या https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
००००
No comments:
Post a Comment