Tuesday, 21 January 2020

थाई मागूर माश्यांच्या संवर्धनास बंदी


नागपूरदि.21 :  थाई मागूर (Clarius gariepinus) हा मासा अतिशय प्रतिकुल परिस्थितीमध्ये वाढु शकतो व तो सर्वभक्षी (Highly Carnivorous) असल्याने निसर्गामध्ये उपलब्ध इतर स्थानिक माशांना अत्यंत धोकादायक आहे. यामुळे पर्यावरणाचे संतुलनावर व इतर स्थानिक माशांचे प्रजातीवर विपरित परिणाम होत आहे. करिता केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसायच्या थाई मागूर माशांचे संवर्धन करु नये याबाबत सूचना दिलेली आहेत.
आता या संदर्भातील मूळ याचिका क्र.381/2018 ही मे. न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी दिनांक 22 जानेवारी 2019 अन्वये निकाली काढली आहे. यामधील आदेशानुसार थाई मागूर माशांचे प्रजनन व मत्स्यपालनावर बंदी घातली असून अस्थित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ठ करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
नागपूर जिल्हयातील अशाप्रकारे थाई मागूर माशांचे संवर्धन करणाऱ्या मत्स्यसंवर्धकांनी थाई मागूर माशांचे संवर्धन त्वरीत थांबविण्यात येऊन थाई मागूर मासे पुर्णत: नष्ट करावेत. तपासणी पथकास अशाप्रकारच्या बंदी असलेल्या थाई मागूर माशांचे संवर्धन आढळल्यास त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, नागपूर यांनी कळविले आहे.
******

No comments:

Post a Comment