नागपूर, दि.21 : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संपूर्ण महाराष्ट्रात 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आलेला आहे. या कायदयाची अंमलबजावणी संपूर्ण जिल्हयात तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी व शहर स्तरावर उपशिक्षणाधिकारी, शहर साधन केंद्र क्र.1 व 2 यांचेमार्फत करण्यात येत असून पालकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी शहर स्तरावर तसेच तालुकास्तरावर तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत आहे.
पालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वा कार्यालयात सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही तसेच कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्काची मागणी केली जात नाही. पालकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नये. पालकांचे संपर्क क्रमांकावर तक्रारी सोडविण्यासाठी नोंदणी शुल्क किंवा इतर शुल्क रोखीने देण्याबाबत कोणी संपर्क साधल्यास अशा व्यक्तीस प्रतिसाद देवू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment