Friday, 13 August 2021
जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन
नागपूर, दि. 13: जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा, गोंड राजे बक्त बुलंद शहा, क्रांतिविर नारायणसिंह उईके, राणी दुर्गावती या आदिवासी क्रांतिकारकांना आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उपायुक्त दशरथ कुळमेथे, सहायक आयुक्त नयन कांबळे, महेश जोशी, विलास कावळे, वरिष्ठ संशोधन अधिकारी संजय पाठक, प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर व कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम यावेळी उपस्थित होते.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment