Monday, 30 September 2024
‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ मध्ये नागपूर विभागातील ७ ग्राम पंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार
विभागीय आयुक्त बिदरी यांच्या मार्गदर्शनात अभिनव यश
नागपूर, दि. ३० : माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यस्तरावर प्रथमच नागपूर विभागातील ग्रामपंचायतींनी कामाची मोहर उमटविली आहे. या अभियानांतर्गत विभागातील सात ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय पुरस्करासाठी निवड करण्यात आली असून १५ ग्रामपंचायतींना विभागीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव यश प्राप्त झाले आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निर्सगाशी संबंधीत पंच तत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील एकूण ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायतींमध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निसर्गाचे पंचमहाभूत भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश यामध्ये कामे केली व सर्व कामांचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल २७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध लोकसंख्या गटानुसार जाहीर करण्यात आला. या निकालात नागपूर विभागातील एकूण ७ ग्राम पंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार व १५ ग्राम पंचायतींना विभागीय पुरस्कार प्राप्त झाले.
या ७ ग्रामपंचायतींची राज्यस्तरावर उत्तम कामगिरी
या अभियानामध्ये विविध मानकांमध्ये सरस कामगिरी करत विभागातील ७ ग्रामपंचातींनी राज्यस्तरावर कामाची छाप सोडली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्याच्या बेला ग्राम पंचायतीला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे १.२५ कोटींचे बक्षिस जाहीर झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्याच्या डव्वा ग्रामपंचातींने तिसऱ्या क्रमांक पटकवला असून ५० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे. या जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या भजेपार ग्राम पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्तेजनार्थ,चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या चीचबोडी ग्राम पंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्त्तेजनार्थ, वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या मिर्झापूर ग्राम पंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्त्तेजनार्थ, याच जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींना उंच उडी (कामाचा प्रगती आलेखात) श्रेणीत प्रत्येकी ५० लाखांचे बक्षिस जाहीर झाले आहेत. यात सेलू तालुक्याच्या हिंगणी ग्राम पंचायतीचा आणि कारंजा तालुक्याच्या ठाणेगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
विभागीय स्तरावर या १५ ग्रामपंचायती ठरल्या अव्वल
'माझी वसुंधरा अभियान ४.०' मध्ये विभाग स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या १५ ग्रामपंचायतींची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी (ता.भद्रावती), नंदा (ता.कोरपना), आनंदवन (ता.वरोरा), भेंडवी (ता.राजुरा), पेटगाव (ता.सिंदेवाही) आणि कुकुडसात (ता.कोरपना) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव (ता.देवळी), आंजी(मोठी) (ता.वर्धा), हिंगणी (ता.सेलु), ठाणेगाव (ता.कारंजा), राजनी (ता.कारंजा) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील खरबी (ता.भंडारा) ग्रामपंचायतीसह नागपूर जिल्ह्यातील गोधनी (ता.नागपूर), नेरी मानकर (ता.हिंगणा), खुर्सापार(ता.काटोल) ग्राम पंचायतींना बक्षिस जाहीर झाले आहेत. विभागातील सर्वोत्तम जिल्हा परिषदांमध्ये गोंदिया जिल्हा परिषदेला बक्षिस जाहीर झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे व जिल्हा परिषदेचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. विपीन इटनकर त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तालयातील विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विभागीय समन्वयक संकेत तालेवार व ईशा बहादे यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे व जिल्हा परिषदेचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
00000
Sunday, 29 September 2024
विकासात्मक कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप
नागपूर, दि. 29 - राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. एकीकडे आपण विकासाची गती कायम राखली असून दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. विकास कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
खामला येथील शांतीनिकेतन कॉलनी मैदान आणि हावरापेठ येथे बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप यावेळी करण्यात आले. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव, स्थानिक आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होत आहेत. एकीकडे लाडकी बहीण सारखी योजना आपण सुरू केली आहे. तर दुसरीकडे लेक लाडकी सारखी योजना सुरू केली. यामाध्यमातून अठराव्या वर्षापर्यंत मुलीला टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपये मिळणार आहेत.
बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. ही योजना केवळ कीट वाटप किंवा पाच हजार रुपये एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण, उपचार, विमा, घर बांधकामासाठी अनुदान या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. भविष्यात सर्व योजना बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदणी कार्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
समाजातल्या मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबीयांपर्यंत आपल्याला मुलभूत सोईसुविधा आणि सेवा कशा पोहोचवता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे करीत असताना सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण वैष्णवी बावस्कर यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
0000000
शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना जो शब्द दिला होता त्याची पूर्तता करता आली याचे खरे समाधान -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे आवंटनपत्र बहाल
नागपूर,दि. 29: देशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून जे वैभव मिहानच्या माध्यमातून नागपूरला मिळत आहे, त्या वैभवाचा पाया हा शिवणगाव येथील अनेक कुटुंबांच्या योगदानातून साकारलेला आहे. शिवणगाव मधील प्रकल्पग्रस्त रहिवासीयांना न्याय भेटला पाहिजे, ज्यांच्या जमीनी गेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला भेटला पाहिजे, यासाठी आम्ही सुरुवातीच्या काळापासून आग्रही होतो. विरोधी पक्ष नेता असतांना यासाठी पुन्हा आपण लढा दिला. तेव्हा रहिवासीयांना फार कमी जागा या दर्शविल्या गेल्या होत्या. रेडीरेकनरचे दर कमी करुन तत्कालीन शासनाने अन्याय केला. मला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर स्थानिकांच्या या अन्यायाला दूर करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले. शिवणगाव वासियांना जो शब्द दिला होता त्याची पुर्तता करता आली याचे आज समाधान आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवणगाव येथील समाज भवनात आयोजित भूखंड वितरण समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, स्थानिक पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थितीत होती.
कोणत्याही प्रकल्पासाठी जागा घेतांना रेडीरेकनरचे दर कमी करुन जागा घेणे हे कोणत्याच कायद्यात बसणारे नव्हते. यासाठी आपल्याला न्यायालयीन लढा द्यावा लागला. या लढयात आपल्याला यश मिळाले. त्यामुळेच शिवणगाव मधील अनेकांना त्यांच्या जमीनीचा कोट्यावधी रुपयांच्या घरात मोबदला मिळाला. अनेकांना आजच्या घडीला कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असेलेले प्लाट मिळाले, याचा मला मनस्वी आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ इटनकर यांनी यासाठी महसूल विभागाशी संबंधित कामे लवकर पूर्ण केल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले.
न्यायाच्या प्रतीक्षेत शिवणगावातील लोकांनी अत्यंत संयमी व जबाबदार नागरिकत्वाचा प्रत्यय दिला आहे. केवळ विदर्भच नव्हे तर भारताच्या गौरवात भर पाडणारे, विदर्भातील व्यवसायाला, उद्योग जगताला, कृषी क्षेत्राला गती देणाऱ्या विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिल्याने आता मार्ग मोकळा झाला आहे. आता या प्रकल्पातुन अनेक क्षेत्रात नवनवीन रोजगाराच्या संधी वाढणार असून स्थानिकांना चांगली संधी मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश भोयर यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवणगाव येथील बबनराव महाले, सागर, संजय, अजय, सुरेश, गजानन महाले, प्रविण वरणकर, संदीप वरणकर , शेषराव शहाणे, दशरथ शहाणे, रामचंद्र शहाणे, राजेंद्र नितनवरे, कविता भोंगाडे, पाडुरंग देशमुख, सरस्वताबाई ठाकरे, निर्मलाबाई ठाकरे, अशोक ठाकरे, सुनिल ठाकरे, रंगराव ठाकरे, शकुंतला, अतुल, अमोल ठाकरे, सुनिल झलके, सविता झलके, अशोक नेवारे, देवराव डेंगे, रमेश डेंगे, सुधाभाई डेंगे आदींना प्रातिनिधीक स्वरुपात भूखंडाचे आवंटनपत्र बहाल करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे कामगारांना कीट वाटप करण्यात आले. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0000000
विकासात्मक कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा प्रयत्न - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप
नागपूर, दि. २९ - राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. एकीकडे आपण विकासाची गती कायम राखली असून दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. विकास कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
खामला येथील शांतीनिकेतन कॉलनी मैदान आणि हावरापेठ येथे बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप यावेळी करण्यात आले. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव, स्थानिक आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होत आहेत. एकीकडे लाडकी बहीण सारखी योजना आपण सुरू केली आहे. तर दुसरकीडे लेक लाडकी सारखी योजना सुरू केली. यामाध्यमातून अठराव्या वर्षापर्यंत मुलीला टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपये मिळणार आहेत.
बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. ही योजना केवळ कीट वाटप किंवा पाच हजार रुपये एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण, उपचार, विमा, घर बांधकामासाठी अनुदान या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. भविष्यात सर्व योजना बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदणी कार्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
समाजातल्या मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय गरीब कुटुंबीयांपर्यंत आपल्याला मुलभूत सोईसुविधा आणि सेवा कशा पोहोचवता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे करीत असताना सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण वैष्णवी बावस्कर यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
*****
Thursday, 26 September 2024
‘निम्न वर्धा प्रकल्पातून होणार 505 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
‘महानिर्मिती’ व ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’यांचा संयुक्त प्रकल्प
नागपूर, दि. २६: निम्न वर्धा प्रकल्पावर उभारण्यात येणाऱ्या ५०५ मेगावॅट क्षमतेच्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी राज्य शासनाच्या ‘महानिर्मिती आणि केंद्र शासनाच्या ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’(एसजेविएनलि.) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी ‘महानिर्मिती’ आणि ‘एसजेविएनलि’ तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे जवळपास १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
निम्न (लोअर) वर्धा प्रकल्प हा वर्धा जिल्ह्यातील आर्वी जवळील वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर असून यावर प्रस्तावित असलेल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाकरिता महानिर्मितीने पूर्ण व्यवहार्यता सर्वेक्षण केले. या प्रकल्पासाठी जवळपास ७३२ हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार आहे. तर विकासकामांसाठी जवळपास ३०३० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून जवळपास १०५१.२८ दशलक्ष युनिट्स वार्षिक हरित ऊर्जा निर्मिती होणार आहे. ३६ महिन्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
तरंगता सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळेल आणि नूतनीकरण योग्य बंध (आरपीओ) पूर्ण करण्यास मदत मिळेल. सौर प्रकल्प स्थापित क्षमतेचे आणि निर्मितीचे समतुल्य उत्सर्जन टाळून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास हा प्रकल्प सहाय्यभूत ठरेल.
या प्रकल्पाच्या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी टाळता येईल तसेच वार्षिक जवळपास ८,६२,०४९ कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन टन कमी होईल. वार्षिक जवळपास ८,४९,४३४ कोळशाचाही वापर टनाने कमी करण्याकरिता मदत मिळणार आहे. ४९/५१ अश्या समभागाने या प्रकल्पाकरिता ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’ आणि ‘महानिर्मिती’ यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे.
00000
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी नागपूर विभागातील 5 हजार 921 नागरीक पात्र
नागपूर, दि. 26 : सर्व धर्मीय जेष्ठ नागरिकांना देश व राज्यातील तिर्थक्षेत्रांना मोफत भेट देता यावी याकरिता सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेंतर्गत नागपूर विभागातील 5 हजार 921 नागरीक पात्र ठरले आहेत. या योजनेचा विभागातील जास्तीत-जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभाग, नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्यासह देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सुरु केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे ही योजना राबविण्यात येत असून या योजेनेंतर्गत नागपूर विभागातून एकूण ५ हजार ९२१ नागरीक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरले आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातून ८६४, वर्धा जिल्ह्यातून ८९१, भंडारा जिल्ह्यातून २ हजार ८८, गोंदिया जिल्ह्यातून २९९, चंद्रपूर जिल्हृयातून ७१७ तर गडचिरोली जिल्ह्यातून १ हजार ६२ नागरीकांचे अर्ज या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. आपापल्या धर्मानुसार तीर्थस्थळांची निवड लाभार्थ्यांना करता येईल. या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रांपैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. तसेच, प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्याचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असावे, विहित नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. लाभार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, जवळच्या नातेवाईकाचे प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्याचे २ लाख ५० हजार रुपयां पर्यंतचा वार्षिक उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आदी अटी व निकष या योजनेसाठी ठरविण्यात आले आहेत. ७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल.
अर्ज करण्यास अडचण येवू नये म्हणून ऑफलाईन अर्जाची सोय करण्यात आली आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामस्तरावरील तसेच तालुकास्तरावरील शासकीय यंत्रणा, सबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालये, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा कार्यालयात संपर्क साधता येणार आहे.
0000
स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरी सुविधा व सौंदर्यीकरणाला प्राधान्य द्यावे - आयुक्त मनोज रानडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचा आढावा
नागपूर, दि. 26 : स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात नागरी सुविधा सौंदर्यीकरण अभियान तसेच विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अश सूचना नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांनी दिल्या.
नागपूर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तसेच प्रशासकीय कामांचा आढावा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आला. त्यावेळी श्री. रानडे बोलत होते.
बैठकीस स्थानिक स्वराज्य संस्थाचे सहआयुक्त संजय काकडे, श्रीमती अश्वीनी वाघमोडे, शंकर गोरे, अधिक्षक अभियंता रत्नाकर बामने, विभागीय सहआयुक्त मनोज कुमार शाहा, सहायक आयुक्त संघमित्रा ढोके, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठणकर, चंद्रपूरचे चंदन पाटील आदी उपस्थित होते.
विभागातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, प्रधानामंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गतीशक्ती योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना करतांना नगरोत्थान अभियान तसेच मालमत्ता कर वसूली, नागरीकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनासाठी असलेले उद्दिष्ट पूर्ण करावेत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी प्राधान्याने सोडवाव्यात असेही आयुक्त मनोज रानडे यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी संघमित्रा ढोके यांनी प्रास्ताविक केले. तर आभार जिल्हा सहआयुक्त विनोद जाधव यांनी मानले.
00000
Monday, 23 September 2024
"मध्यस्थता ही विवाद का समाधान" - न्या. सचिन पाटील
जिला विधिक सेवा प्राधिकरण द्वारा आयोजित जागरूकता कार्यक्रम
नागपूर, दि.22 : जिला विधिक सेवा प्राधिकरण नागपूर की ओर से आयोजित जागरूकता कार्यक्रम में जिला विधिक सेवा प्राधिकरण नागपूर के सचिव न्यायाधीश सचिन पाटील ने कहा कि, मध्यस्थता वैकल्पिक विवाद का समाधान है और प्रलंबित अदालती मामलों के शीघ्र निपटाने के लिए यह प्रक्रिया बहुल उपयोगी है! म्ध्यस्थता गोपनीय, स्वैच्छिक, पारदर्शी ओर कम खर्चे की प्रभावी प्रक्रिया है! मध्यस्थता प्रक्रिया मे आपसी सामंजस्य से मामला सुलझाया जाता है! इसलिये ज्यादा से ज्यादा पक्षकारों से अपना पैसा, समय और श्रम बचाने के लिये और बिना देरी न्याय पाने के लिये इस प्रक्रिया का लाभ उठाने का भी न्या. सचिन पाटील ने आवाहन किया !
वर्ष 2021 से अबतक 1,741 प्रलंबित मामले निपटाए गये
नागपूर जिला न्यायालय और क्षेत्रीय/तालूका न्यायालयों में कार्यरत मध्यस्थता केंन्द्र में 2021 साल से अबतक मध्यस्थता प्रक्रीया के लिए भेजे गए प्रलंबित अदालती मामलोंमेसे 1,741 मामले निपटाए गये ये जानकारी न्या. सचिन पाटील ने दी।
जिला न्यायालय के प्रमुख जिला न्यायाधीश डी. पी. सुराणा के मार्गदर्शन में जिला न्यायालय के न्यायाधीश सभागृह में हाल ही में मध्यस्थता जागरूकता कार्यक्रम आयोजित किया गया था ! कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में न्या. पाटील बोल रहे थे! प्रमुख अतिथी के रूप में मध्यस्थता प्रशिक्षक एड. राजेंन्द्र राठी एवं एड. सुरेखा बोरकुटे उपस्थित थे ! न्या. पाटील ने वैकल्पिक विवाद निवारण पध्दति, मध्यस्थता संकल्पना, मध्यस्थता प्रक्रिया में पक्षकार, विधिज्ञ और मध्यस्थता की भूमिका विषयों पर भी मार्गदर्शन किया !
एड. राजेंन्द्र राठी ने मध्यस्थता प्रक्रिया में किस प्रकार के प्रकरण न्यायालय में दाखिल किए जाते है, पक्षकारों के बीच विवादों को कुछ नियमों और शर्तों के अधीन मध्यस्थता प्रक्रिया के माध्यम से कैसे निपटाया जाता है, साथ ही मध्यस्थता प्रक्रिया के माध्यम से निपटाए गए मामलों में कितना समय और पैसा लगता है जैसे विषयों पर विस्तार से बताया !
एड. सुरेखा बोरकुटे ने समान न्याय के सिध्दांतो, जिला विधी सेवा प्राधिकरण द्वारा प्रदान की जानेवाली निःशुल्क कानूनी सेवाओं और मध्यस्थता प्रक्रिया के लाभों के बारे में जानकारी दी ! कार्यक्रम का संचालन विधी स्वयंसेक डॉ. आनंद मांजरखेडे ने किया! आभार एड. श्रीमती शुभांगी काळे ने माना! मध्यस्थता अधिवक्ता श्री. जोगेवार ने मध्यस्थता के बारे में उनके अनुभव बताए। कार्यक्रम में पक्षकार, मध्यस्थता अधिवक्ता, लॉ कॉलेज के छात्र और जिला विधि सेवा प्राधिकरण के कर्मचारी बडी संख्या में उपस्थित थे !
00000
Sunday, 22 September 2024
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यास मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त - न्या. सचिन पाटील
नागपूर, दि. 22 : मध्यस्थी हा वैकल्पिक वाद निवारणाचा एक उत्तम मार्ग असून न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा होण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश सचिन पाटील यांनी केले.
नागपूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या न्यायाधीश सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्री. डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मध्यस्थी जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. मध्यस्थ प्रशिक्षक अँड .राजेंद्र राठी आणि प्रशिक्षित मध्यस्थी अधिवक्ता ॲड. सुरेखा बोरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायाधीश पाटील यांनी असेही प्रतिपादन केले की, दिवाणी प्रक्रीया संहीताचे कलम ८९ मध्ये प्रावधानित मध्यस्थी प्रकिया गोपनीय, ऐच्छिक, पारदर्शक, लवचिक व कमी खर्चीक असून न्यायालयातील प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे मध्यस्थी प्रक्रियेद्वारे निकाली काढता येतात. या प्रक्रीयेद्वारे प्रकरणे निकाली निघाल्यास दोन्ही पक्षांना मैत्रीपुर्व वातावरणात अधिक समाधान देणारा त्वरीत न्याय मिळतो व त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहतात आणि पैसा, वेळ आणि श्रम यांची बचत होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हा न्यायालय नागपूर व तालूका न्यायालयांमध्ये मध्यस्थी केंद्र कार्यरत असून तेथे दाखलपूर्व आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे प्रशिक्षित न्यायिक अधिकारी व अधिवक्ता यांच्या मध्यस्थीने समोपचाराने निकाली काढण्यात येत असून पक्षकारांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
वर्ष २०२१ पासून आजपर्यंत १७४१ प्रलंबित प्रकरणे निकाली
सन २०२१ पासून नागपूर जिल्हयातील न्यायालयांनी मध्यस्थी प्रक्रियेसाठी संदर्भित केलेल्या प्रलंबित प्रकरणांपैकी १,७४१ प्रकरणे सामोपचाराने मिटल्याची माहीती न्या. सचिन पाटील यांनी दिली.
मध्यस्थी अधिनियम २०२३ आणि मध्यस्थी प्रक्रियेसाठी कोणती प्रकरणे ठेवता येतात याबाबत अँड. श्री. राजेंद्र राठी यांनी मार्गदर्शन केले. ॲड. बोरकुटे यांनी मध्यस्थी प्रक्रियेची गरज, फायदे, समान न्याय तत्वांबाबत माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर येथील विधी स्वयंसेवक डॉ. आनंद मांजरखेडे यांनी सुत्रसंचालन केले. मध्यस्थ अधिवक्ता श्री. जोगेवार यांनी मध्यस्थी प्रक्रीये बाबतचे त्यांचे अनुभव सांगितले. तसेच मध्यस्थी अधिवक्त्या शुभांगी काळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात पक्षकार, मध्यस्थ अधिवक्ता, अनेक विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी, विधी स्वयंसेवक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात 'एक मुठ्ठी आसमान' या नालसा गीताने आणि रोपट्यांना जलार्पण करून करण्यात आली.
00000
बांधकाम कामगारांना विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बांधकाम कामगार मेळावा ;उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरक्षाकवच कार्ड,संसार व सुरक्षा किटचे वाटप
नागपूर, दि. 21 : विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्यादृष्टीने राज्य शासन कार्य करीत आहे. बांधकाम कामगार मंडळाद्वारे राज्यातील 38 लाखांवरील कामगारांची नोंदणी करून विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात केले. त्यांच्या हस्ते कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
येथील गोपालनगर परिसरातील नवनिर्माण गृह संकुलाच्या मैदानावर आयोजित ‘बांधकाम कामगार मेळाव्यात’ उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव, माजी महापौर संदीप जोशी, नगर सेविका सोनाली कडू आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध शासकीय योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच ज्या मुलांचा मानाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश झाला त्यांना शिक्षण शुल्क माफ करण्यात आले आहे. या कामगारांच्या कुटुंबियांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येत आहे. बेघर कामगारांना ‘अटल आवास योजना’ आणि ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या माध्यमातून 4 लाखांची आर्थिक मदत देऊन हक्काची घरे देण्यात आली. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यात येत आहे.बांधकाम कामगारांना आज सुरक्षाकवच कार्ड देण्यात आले असून याद्वारे कामगारांच्या कुटुंबियांना आरोग्य,शिक्षण,घरकुल आदी 12 सेवा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यशासनाने जनसामान्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपयांची मदत देण्यात येते. ‘लेक लाडकी योजने’च्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षा पर्यंत टप्प्या टप्प्याने 1 लाखा पर्यंतची मदत देण्यात येत आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. राज्यातील 1 कोटी महिलांना लखपतीदीदी करण्याचा निर्धार राज्य शासनाने घेतला आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी ‘कमवा आणि शिका’ योजने प्रमाणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली असून या योजनेचा राज्यातील जास्तीत –जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
सोनाली कडू यांनी प्रास्ताविक केले तर ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांनी स्वागतपर भाषण केले. या कार्यक्रमात श्री फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
०००००
Friday, 20 September 2024
सारथीतर्फे युवक-युवतींकरिता मोफत रिमोट पायलट प्रशिक्षण
ऑफलाईन अर्ज करण्याची २३ सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत
नागपूर, दि. 20 : ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ पुणे, (सारथी) यांच्यातर्फे परभणी व राहुरी येथे मोफत रिमोट पायलट प्रशिक्षणाकरिता २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत कुणबी-मराठा या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवतींना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजीटल फारमिंग सोलुशन्स बाय रोबोट ड्रोन ॲन्ड एजवी या डिजीसीए मान्यता प्राप्त ड्रोन प्रशिक्षण केंद्रावर रिमोट पायलट प्रशिक्षण व कृषी आधारित ड्रोन विषयक व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे रिमोट पायलट ट्रेनिंग केंद्रावर रिमोट पायलट प्रशिक्षण घेण्याकरिता सारथीकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तर २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठविता येणार आहे.
या उपक्रमासंदर्भात विस्तृत माहिती सारथीच्या http://sarthi-maharashtragov.in
या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून या संधीचा फायदा घेत लक्षित गटातील जास्तीत-जास्त युवक-युवतींनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, नागपूर सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.
00000
Thursday, 19 September 2024
वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वीज निर्मिती कंत्राटी कामगारांकडून उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार
नागपूर, दि. 19 : राज्य सरकार संवेदनशीलपणे कार्य करीत असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. वीज निर्मिती कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. यापुढे जात जोखीम घेवून काम करणाऱ्या वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तमोत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्याची व्यवस्था तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मूळ वेतनात १९ टक्के पगार वाढ, ५ लाख मेडिक्लेम, ६० वर्ष रोजगाराच्या हमीसह महत्वाच्या सहा मागण्या मान्य केल्याबद्दल वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समीती खापरखेडा व कोराडी यांच्यावतीने दहेगाव येथील रामदरबार मंदिर परिसरात आयोजित कामगार मेळावा व सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार सर्वश्री मल्लीकार्जुन रेड्डी, सुधाकर कोहळे, वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समीतीचे अध्यक्ष चंद्रदास भालदार, संयोजक नचिकेत मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कंत्राटी कामगारांसाठी निर्णय घेवून केलेल्या कर्तव्यपूर्तीबाबत कृतज्ञता म्हणून आज सत्कार होत असल्याचा मनापासून आनंद आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कोतवाल, कंत्राटी कामगार आदींच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली. नियमित कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारांना १९ टक्के वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. मेडीक्लेमचा निर्णय घेण्यात आला असून यात बदल करण्याची मागणी पूर्ण करून राज्यातील उत्तमोत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्याची व्यवस्था तयार करण्यात येईल, असे ते म्हणाले. कंत्राटी कामगारांना नियमित भरतीमध्ये 10 गुण देण्याचा निर्णय, कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय, कंत्राटदाराच्या नावाच्या गेटपास ऐवजी कंत्राटी कामगारांच्या गेटपासवर महानिर्मिती व महावितरण चा शिक्का देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून कंत्राटी व असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यात आली असून ३४ मंडळ तयार करण्यात आले आहेत. या मंडळांच्या माध्यमातून त्यांच्या हिताच्या योजना थेट पुरवून त्यांना सामाजिक स्थेर्य देण्याच्या दृष्टीने कार्य सुरु असल्याचेही ते म्हणाले. कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यात पैसे देण्याचा निर्णय झाला. मात्र, काही ठिकाणी कंत्राटदार हे कामगारांचे एटीएम कार्ड स्वतः जवळ ठेवत असल्याचे प्रकरणे पुढे येत आहेत. अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने महिलांसाठी महत्वाचे निर्णय घेतल्याचे सांगत विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी महिलांना लखपतीदीदी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. एसटीमध्ये महिलांना अर्धे तिकीट केले, त्याने तोट्यात असलेली एसटी नफ्यात आली. राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत केले आहे. 'मुख्यमंत्री- माझी लाकडी बहीण' योजनेतून १ कोटी ६० लाख महिलांच्या बँक खात्यात आर्थिक लाभ दिला आहे. पुढील महिन्यापर्यंत अडीच कोटी महिलांना या योजेअंतर्गत आर्थिक लाभ देणार असून ही योजना बंद होवू देणार नाही. या योजनेसाठी दलित निधीचे पैसे वळविले नसल्याचे सांगत या संदर्भातील आरोप निराधार असल्याचेही ते म्हणाले.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे, कामगार संयुक्त कृती समीतीचे अध्यक्ष चंद्रदास भालदार, संयोजन नचिकेत मोरे यांनी यावेळी उपस्थितांना मागदर्शन केले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषणकर्ते वीज निर्मिती कंत्राटी कामगार सतीश तायडे यांना गौरविण्यात आले.
000000
Wednesday, 18 September 2024
संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी १०९८ हेल्पलाईन क्रमांक
‘येता संकट बालकावरी १०९८ मदत करी’
नागपूर, दि. 18 : संकटग्रस्त बालकांना त्वरित मदत पुरविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ कार्यान्वित केला असून या सेवेचा संकटग्रस्त बालक किंवा या बालकास मदत करणाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभाग-नागपुरचे विभागीय उपायुक्त ऐ.जे. कोल्हे यांनी केले आहे.
बाल कामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरविलेली बालके, सापडलेली बालके, मतदीचे आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास त्यांना त्वरित आवश्यक मदत पुरविण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. संकटग्रस्त बालकांना त्वरित मतदतीकरिता केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ० ते १८ वर्ष वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी ही चाईल्ड हेल्पलाईन सेवा कार्यारत आहे.
000000
थेटप्रसारण
थेटप्रसारण
| महापे, नवी मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मे. आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लि. यांच्या OSAT (Outsourced Semiconductor Assembly & Testing) फॅसिलिटी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा
#LIVE
खालील लिंक्सवर क्लिक करून थेट प्रसारण पाहा
Twitter
https://x.com/i/broadcasts/1BRKjwjpbzoGw
Facebook
https://fb.watch/uGpU68Zqtc/
Youtube
https://youtu.be/08AqOBkMn_E
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या संवादातून वरुड येथील ‘त्या’युवकांनी घेतला सचोटीचा संकल्प
नागपूर, दि. 16 : नागपूर येथील राजभवनातील मुख्य बैठक सभागृह. एरवी सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांनी गजबजलेल्या या वातावरणात वरुड येथील 15 युवकांच्या टिमला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. “ राष्टाप्रती सतत प्रामाणिक राहून शक्य तेवढे योगदान देण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण होत आहेत. प्रत्येकाने आपला निश्चय पक्का केला की निर्धारित लक्ष्य-ध्येय गाठणे सोपे होते. स्वत:वर विश्वास ठेवा, सचोटी आणि प्रमाणिकतेला सतत प्राधान्य द्या ” असा मौलीक सल्ला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी या युवकांना दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक युवक हताश झाले होते. त्यांच्या मनातील या कोंडीला वाट मिळावी या दृष्टीने 2021 मध्ये वरुडच्या पोलीस स्टेशनद्वारे एक अनोखा प्रयोग केला गेला. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ हरि बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ श्रेणिक लोढा यांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच स्पर्धा परिक्षेचे एक लहान ग्रंथालय सुरु केले. यात स्थानिक डॉ. मनोहर आंडे, प्रा. किशोर तडस, तारेश देशमुख, नितीन खेरडे यांनी आपला वेळ दिला.
जागेच्या उपलब्धतेनुसार अवघ्या तीस विद्यार्थ्यांची इथे सोय करणे शक्य झाले. यातील २० विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा व इतर निवडणूक प्रक्रियेतून शासकीय सेवेस पात्र झाले. या वीस मुलांपैकी सुमारे पंधरा युवकांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन पोलीस विभागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
“ आम्ही दोघेही शिक्षणानंतर होमगार्डमध्ये सहभागी झालो. नोकरीची नितांत आवश्यकता होती. कोरोनाच्या काळात सारेच डळमळीत झाल्याने आम्ही निराशेच्या वाटेवर केव्हा गेलो ते लक्षातही आले नाही. अशा काळात पोलीस स्टेशनमधील ग्रंथालयाने आम्हाला मोठा दिलासा मिळाला. त्यावेळेस परीक्षाविधीन कालावधीत लोढा यांनी आमचा विश्वास द्विगुणित केला. पहिल्याच प्रयत्नात पोलीस विभागात पोलीस व्हायचे आमचे स्वप्न साकार झाले ” असे कॉन्स्टेबल धिरज तेटू व दीप गुढदे यांनी सांगितले.
वरुड येथील डॉ. आंडे, प्रा. तडस व गावातील इतर व्यक्तींनी वरुड पोलीस स्टेशनच्या सहाय्याने हा उपक्रम आजही सुरु ठेवला आहे. योगायोगाने ज्यांनी हा साकारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली ते तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ श्रेणिक लोढा हे आता राज्यपाल महोदयांचे परिसहाय्यक आहेत.
0000
सर्वांगीण विकासासाठी वाहतुकीच्या सुविधा अद्ययावत होणे आवश्यक -राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर – सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस
ट्रेनचा ऑनलाईन शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
नागपूर, दि. 16–प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वेचा कायापालट करण्यात येत आहे.
देशातील विविध भागातून सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन हा या
उपक्रमाचा एक भाग आहे. कुठल्याही देशाच्या सर्वांगीण विकासात सार्वजनिक वाहतूक
मार्गांचा विकास मोलाचा ठरत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी
आज येथे केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अहमदाबाद येथून देशातील
सहा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला. यात नागपूर रेल्वे
स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर संत्रा मार्केट पश्चिमीद्वार येथे आयोजित
कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आणि केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री
नितीन गडकरी नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून
रवाना केले. यावेळी आमदार कृपाल तुमाने, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा,
मंडळ रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यावेळी उपस्थित होते. नागपूर हे शहर देशाच्या
मध्यभागी आहे. विशेषतःरेल्वे प्रवाशांसाठी हा मार्ग महत्वाचा आहे. देशातील इतर
भागाची नागपूर शहराशी कनेक्टिव्हिटी वाढल्यास नागपूर व परिसराचा विकास होण्यास मदत
होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे जाळे देशविकासात मोलाची भूमिका बजावत असते.
रस्ते, रेल्वे आणि विमान या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे यात समावेश आहे.
नागपुरातून दक्षिणेकडे जाणा-या अधिक रेल्वे सुरू होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.
0000000
मध्य भारताच्या प्रवासी वाहतुकीसाठी वंदे भारत ट्रेन मोलाची - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर दि.16–सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू व्हावी ही या भागातील नागरिकांची अनेक
दिवसांपासून मागणी होती. आज या मागणीला मूर्त रूप आले आहे.मध्य भारताच्या प्रवासी
वाहतुकीसाठी वंदे भारतची ट्रेन ही मोलाची उपलब्धी असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राज्यपाल म्हणाले, नागपूर
व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक विकास व्हावा असा प्रयत्न आहे.
नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक
व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी
म्हणाले.
0000
राज्यात लाडकी बहीण योजनेचा "नागपूर पॅटर्न" प्रसिद्ध होणार - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
आदिती तटकरे यांच्या हस्ते कोराडी येथे अगरबत्ती युनिटचे उद्घाटन
महिलांना फुडस्टॉल्स आणि धनादेशांचे वितरण
लाडकी बहीण महिला सशक्तीकरण मेळावा
नागपूर, दि. 16 : 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेतील जवळपास 30 लाखांचा आर्थिक लाभ नागपूर महिला सन्मान सहकारी पतसंस्थेत जमा करून या योजनेच्या निधीचा योग्य विनियोगाचा आदर्श वस्तूपाठ नागपूर जिल्ह्यातील महिलांनी घालून दिला आहे.संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेसंदर्भातील हा ‘नागपूर पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध होईल, असा विश्वास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे व्यक्त केला. तसेच, महिलांद्वारे निर्मित उत्पादनाच्या ऑनलाईन विक्रीसाठी ‘यशस्वीनी’ वेबपोर्टलवर उत्पादनांची नोदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी मंदिर परिसरात आदिती तटकरे यांच्या हस्ते अगरबत्ती युनिटचे उद्घाटन झाले. यानंतर आयोजित ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण मेळाव्यात’ त्या बोलत होत्या. आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे आणि टेकचंद सावरकर, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सरपंच नरेंद्र धानोले आदी यावेळी उपस्थित होते.
आदिती तटकरे म्हणाल्या, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्वाचे पाऊले उचलली आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ जमा करण्यात येतो. नागपुरात या योजनेच्या टप्पा दोन अंतर्गत 31 ऑगस्टला 52 लाख महिलांच्या बँक खात्यात लाभ जमा करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील 3 हजार महिलांनी एकत्र येत नागपूर महिला सन्मान सहकारी पतसंस्थेत 1500 पैकी 1000 रुपये असे जवळपास 30 लाख रूपयांचे भांडवल उभारले आहे.यातून महिला बचतगटांना गती मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट असून नागपूर जिल्ह्यातील महिलांनी यादिशेने पाऊले टाकल्याचे सांगत हा नागपूर पॅटर्न राज्यभरात प्रसिद्ध होईल असेही त्या म्हणाल्या. या योजनेच्या नोंदणीसाठी सप्टेंबर महिन्यात अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कोराडी येथील अगरबत्ती युनिटच्या माध्यमातूनही महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगत त्या महिलांच्या उत्पादनाची ऑनलाइन विक्री करण्यासाठी 'यशस्विनी पोर्टल'वर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिला व बाल विकास विभागाने नुकतेच या पोर्टलची सुरुवात केली असून राज्यात माविम आणि उमेद च्या माध्यमातून 11 हजार महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनाची नोंदणी केली आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील महिलांनी आपल्या उत्पादनांची नोंदणी या पोर्टलवर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नागपूर जिल्ह्यात जिल्हा खनिकर्म निधीतून अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सायकल देण्याच्या संकल्पनेचे कौतुक करत या प्रस्तावास महिला बाल विकास विभागाने मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहरात महिलाचालक असणारे 1400 पिंक रिक्षा सुरू करण्यात येईल व या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. जगदंबा महालक्ष्मी संस्थान कोरोडी येथे तसेच कामठी तालुक्यातही असे पिंक रिक्षा सुरू करण्यास विशेषबाब म्हणून मंजुरी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूरद्वारे संचालित व जिल्हा नियोजन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अर्थ सहाय्यातून 10 प्रातिनिधिक फिरत्या फूड स्टॉलचे आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यांच्या हस्ते आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकाकडून महिला बचत गटांना देण्यात आलेल्या कर्जाचे धनादेश प्रातिनिधिक रित्या वितरीत करण्यात आले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि टेकचंद सावरकर, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले.
******
सार्वजनिक बांधकाम विभागात देश उभारणीची मोठी ताकद सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
उत्कृष्ट अभियंते, कर्मचारी व प्रकल्पांचा केला सन्मान
नागपूर दिनांक. 15...सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते हे देशाच्या परमवैभवासाठी आवश्यक असलेली व्यवस्था उभे करत असतात. संपूर्ण देशाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. त्यामुळे हा विभाग म्हणजे देश उभारणीसाठीची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार २०२३-२४ वितरण सोहळा रविवारी सुरेश भट सभागृहात रविवार उत्साहात पार पडला. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते.
मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटनकर-म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, सचिव सतीश कोळीकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतीश चिखलीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील तसेच, पायाभूत विकास महामंडळ सचिव विकास रामगुडे, सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे व राज्यभरातील बांधकाम विभागाचे पदाधिकारी, अभियंते उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे अभियंते, वास्तुशास्त्रज्ञ, अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा कुटुंबियांसह सत्कार करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार वितरीत करण्यात आले.
रविंद्र चव्हाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ असा उल्लेख करताना त्यांच्या या विभागातील कार्याचा गौरव केला. चव्हाण म्हणाले, अभियंता म्हणून कर्तव्य करत असताना कामामधील त्रुटी शोधून, त्यावर उपाय योजणे, नियोजन व नंतर निर्मिती करणे हेच ध्येय समोर असले पाहिजे. परिवर्तनाच्या दिशेने जाणे फार गरजेचे असून गतिमान पद्धतीने काम करण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. तरच भविष्यात यश प्राप्त होईल. प्रकल्प व्यवस्थापन व त्याचे लाभ समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने विभाग काम करीत असून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून 100 टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विभागातील सर्वांचे सहकार्य लागणार असून विभागाची मान उंचावण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे ठरणार आहे, असे ते म्हणाले. अभियंता दिनाला केवळ कार्यक्रम साजरा न करता तो कर्तव्य दिवस म्हणून पाळावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
मनिषा पाटणकर – म्हैसकर उपस्थित अभियंत्यांना संबोधित करताना म्हणाल्या, भारतरत्न डॉ. विश्वेश्वरया यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वाचा वारसा आपल्याला लाभला आहे. तो आपण आपल्या कार्याच्या माध्यमातून जपायचा असून हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आतापर्यंत राज्यस्तरीय अभियंता दिनाचा कार्यक्रम मुंबईत साजरा केला जात असे. पहिल्यांदाच तो विदर्भ-नागपुरात होत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे विदर्भावरील प्रेम व आदर दिसून येते.
भारताच्या अमृतकाळात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे योगदान मोठे राहणार असून अनंत काळ टिकतील असे रस्ते, वास्तू निर्माण करणारा विभाग व गुणवत्ता, कार्यक्षमता आणि गतिमानता ही आपल्या विभागाची ओळख निर्माण होईल, असे आश्वासन मनिषा पाटणकर यांनी यावेळी दिले.
पुरस्कार प्राप्त अभियंते व कर्मचा-यांचे अभिनंदन करताना सदाशिव साळुंखे यांनी डॉ. विश्वेश्वरय्या यांनी देशाला आपल्या कल्पक व दूरदृष्टीने देशाला नवी दिशा दिल्याचे सांगितले. आपल्या विभागासमोर यापुढे अनेक आव्हाने उभी राहणार असून डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रेरणेतून आपण त्या आव्हानांचा सामना सहजपणे करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय दशपुते म्हणाले, नवीन प्रकल्पांसाठी उत्कृष्ट कामगिरी करणा-यांना दरवर्षी पुरस्कृत केले जाते. नव्याने विभागात नियुक्त झालेल्या 1500 अभियंत्यांसाठी हा कार्यक्रम जिद्दीने काम करण्यासाठी प्रेरणा देईल.
दिनेश नंदनवार यांनी प्रास्ताविकातून भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कार्यावर प्रकाश टाकत भारताच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान राहिले असल्याचे सांगितले. विश्वेश्वरय्या यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्व अभियंते सचोटीने कार्य करतील व भारताच्या विकासात योगदान देतील, असे ते म्हणाले.
दीप प्रज्वलन व डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पाची माहिती देणा-या कॉफीटेबल बुकचे विमोचन तसेच, दिनेश नंदनवार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. परिसरात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटनदेखील रविंद्र चव्हाण हस्ते करण्यात आले. त्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली व कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी गलांडे-देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जनार्दन भानुसे यांनी केले.
.......बॉक्स....
उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार
उत्कृष्ट पूल - अंभोरा येथील वैनगंगा नदीवरील अत्याधुनिक पूल
उत्कृष्ट इमारत – पोरीबंदर येथील उत्पादन शुल्क विभाग मुख्यालय इमारत
उत्कृष्ट रस्ता – पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक परिक्रमा मार्ग
.......
डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताने साध्य केलेली प्रगती लोकशाहीच्या भवितव्याला अधिक उज्वल करणारी* - उपराष्ट्रपती जगदीप धनखड
*तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या प्रगतीसह भ्रष्टाचाराला आळा*
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
*रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे लोकार्पण*
*राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची विशेष उपस्थिती*
नागपूर, दि. १५ - भारताला एकेकाळी एकेकाळी स्लिपिंग जायंट म्हणून ओळखल्या जायचे. ती ओळख आता आपण पूर्णतः पुसून काढली असून तंत्रकौशल्यात एक मैलाचा टप्पा आपण गाठला आहे. शिक्षणापासून ते डिजीटल तंत्रज्ञानापर्यंत आपण साध्य केलेली प्रगती ही लोकशाहीच्या भवितव्याला अधिक उज्ज्वल करणारी असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरच्या कोनशिलेचे अनावरण व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित विशेष समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, रामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, चान्सलर डॉ एस एस मंथा, कुलगुरू डॉ आर एस पांडे, सचिव राजेंद्र पुरोहित व मान्यवर उपस्थित होते.
आज जागतिक लोकशाही दिन आपण साजरा करीत आहोत याचा धागा पकडून त्यांनी लोकशाहीच्या सशक्तीकरणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण ही सेवा आहे. सामाजिक उत्तरदायित्वाचे यात भान आहे. शिक्षणाच्या व्यवसायापेक्षा नैतिकतेला, आदर्श विद्यार्थी घडवायला रामदेवबाबा शिक्षण संस्थेने आजवर दिलेल्या योगदानाचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गौरव केला.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व उपराष्ट्रपती धनखड यांनी विषद केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण होत असतात. हीच आव्हाने संधीत रुपांतरित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि ग्रीन हायड्रोजन यासारखे तंत्रज्ञान हे गेम चेंजर ठरणार असल्याचे ते म्हणाले.
*डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या प्रगतीसह भ्रष्टाचाराला आळा*
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वात भारताची पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पहिले जात आहे. प्रगतीच्या या प्रवासात डिजिटल इकॉनॉमिचे अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभार्थ्यांना दिला जाणारा लाभ हा याच डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही मध्यस्थाविना सरळ त्याच्या खात्यात जमा होत आहे. जगाच्या तुलनेत आपण साध्य केलेल्या लक्षणीय प्रगतीकडे सर्व देश आश्चर्याने पाहात असल्याचे ते म्हणाले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे नवे प्रवेशद्वार खुले झाले आहे. यात अनेक संधी दडलेल्या आहेत. खेड्यापाड्यात हे तंत्रज्ञान आता रुजले असून आपल्याला आता कुशल मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
रामदेवबाबा सारख्या त्यागावर उभारलेल्या संस्थेतून येणारी विद्यार्थी हे देशाच्या प्रगतीला मोलाचा हातभार लावतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अभियांत्रिकेच्या तीन शेडमध्ये सुरू झालेल्या रामदेव बाबा महाविद्यालयाचा प्रवास हा येथील शिक्षकांनी विद्यापीठाच्या निर्मितीपर्यंत आणल्याचे भाऊक उद्गार माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काढले. येथील ३०० प्राध्यापक उच्च गुणवत्ताधारक असून २०० अध्यापक हे डॉक्टरेट असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या साध्या जीवनाची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी रामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात 'एक पेड मन के नाम' अभियानांतर्गत वृक्षारोपण केले. मान्यवरांच्या हस्ते रामदेवबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
00000
Saturday, 14 September 2024
ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी
नागपूर, दि. 14 : राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि. 16 सप्टेंबर, 2024 रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात.
नागपूर जिल्हयातील मुस्लीम धर्मीयांकडून काढण्यात येणा-या मिरवणुकीसबंधी मुस्लीम बांधवांसोबत सल्लामसलत करुन शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने सोमवार, दि. 16 सप्टेंबर करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या आदेशान्वये कायम ठेवण्यात आली आहे.
0000
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज नागपुरात
• रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे त्यांच्या हस्ते लोकार्पण
• राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचीही राहणार उपस्थिती
नागपूर, दि. 14 : मा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन दिनांक १५ सप्टेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत.
रामदेबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे लोकार्पण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार आहे.
मा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होईल. दुपारी २.४० वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी विमानळावरून प्रस्थान होईल. दुपारी २.५५ वाजता रामदेवबाबा विद्यापीठ येथे आगमन, दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान रामदेवबाबा विद्यापीठाच्या डिजिटल टॉवर लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ४ वाजता मा. उपराष्ट्रपती महोदयांसमवेत मा. राज्यपाल यांचे विमानतळाकडे प्रस्थान. दुपारी ४.२५ वाजता उपराष्ट्रपती महोदयांच्या प्रस्थानप्रसंगी मा. राज्यपाल यांची उपस्थिती. उपराष्ट्रपती यांचे नागपूर येथून प्रयाण झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मा. राज्यपाल यांचे राजभवन, नागपूर येथे आगमन व मुक्काम.
१६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४० वाजता राजभवन येथून नागपूर रेल्वेस्थानकाकडे प्रस्थान. दुपारी 3.55 वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन. दुपारी ४ वाजता नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस, पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस, कोल्हापूर-पुणे एक्सप्रेसला हिरवा झेंडा ते दाखवतील. सायंकाळी ५.१५ वाजता राजभवन येथे आगमन. रात्री ९.०० वाजता राजभवन येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाकडे प्रस्थान. रात्री ९.५० वाजता विमानाने मा. राज्यपाल महोदयांचे मुंबईकडे प्रयाण होईल.
0000
Friday, 13 September 2024
राज्यात बॉक्साईट, कायनाईट-सिलीमनाईट, तांबे खनिजांचा शोध
राज्य भूवैज्ञानिय कार्यक्रम मंडळाची ६०वी बैठक
गोंदिया-छत्तीसगड क्षेत्रात युरॅनियमचे पूर्वेक्षण
नागपूर, दि. १3: भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाद्वारे खनिज सर्वेक्षण व समन्वेषणाच्या १२ भूवैज्ञानिय योजनांमुळे नागपूर जिल्ह्यात कायनाईट-सिलीमनाईट या खनिजांचे साठे शोधण्यात आले असून नागपूर शहर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात चूनखडक तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात बॉक्साईड खनिजांची विपूल प्रमाणात साठे उपलब्ध असल्याचा शोध घेण्यात आला आहे. परमाणु खनिज संचालनालयातर्फे गोंदिया व छत्तीसगड सिमाक्षेत्रात बिजली रायोलाईट या भूस्तरामध्ये युरॅनियम खनिजांची पूर्वेक्षण योजना प्रस्तावित आहे.
राज्य भूवैज्ञानिय कार्यक्रम मंडळाची ६० वी बैठक अतिरिक्त मुख्य सचिव (खनिकर्म) इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सन 2023-24 मध्ये संचालनालयातर्फे राबविण्यात आलेल्या योजना तसेच 2024-25 मध्ये प्रस्तावित असलेल्या खनिज सर्वेक्षणाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी भूविज्ञान व खनिकर्म संचालनालनायाच्या संचालक श्रीमती अंजली नगरकर, भारतीय भूवैज्ञानिय सर्वेक्षण विभागाचे संचालक नवजीत सिंग नैय्यर, एमइसीएलचे प्रदीप कुळकर्णी, माईलचे शुभम अंजनकर, जवाहरलाल नेहरु ॲल्युमिनीअम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरचे मुख्य वैज्ञानिक प्रवीण गुप्ते, महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन अपाययोजन केंद्राचे अजय देशपांडे, वेकुलीचे ओम दत्त, महासंचालक टि.आर. के. राव, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे श्रीराम कडू, एस.पी. आवळे, उपसंचालक रोशन मेश्राम आदी उपस्थित होते.
भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयातर्फे राज्यात १२ भूवैज्ञानिय योजनाद्वारे खनिज सर्वेक्षण व समन्वेषण करण्यात आले असून यामध्ये चूनखडक कायनाईट-सिलीमनाईट, बॅाक्साईट खनिजांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच 2024-25 या वर्षात खनिज सर्वेक्षण-पूर्वेक्षणाच्या १५ योजना राबविण्यात येणार आहे. या योजना चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर व भंडारा या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये इतर खनिजासोबत तांबे पूर्वेक्षणाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
गोंदिया-छत्तीसगडच्या सिमेवर युरॅनियम खनिज सर्वेक्षण
भारतीय भूवैज्ञानिय सर्वेक्षण (जीएसआय) तर्फे तांबे, बॉक्साईट रेअर अर्थ एलिमेंट या खनिजांचे सर्वेक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. गोंदिया व छत्तीसगड राज्याच्या सिमाक्षेत्रात बिजली रायोलाईट या भूस्तरामध्ये युरॅनियम खनिजांची पूर्वेक्षण योजना प्रस्तावित करण्याची माहिती परमानू खनिज निदेशालयाचे निदेशक श्री. मन्थनवार यांनी बैठकीत दिली.
मॉईलतर्फे भंडारा व नागपूर जिल्ह्यातील चिखली, डोंगरी बाजार, कांद्री व बेलडोंगरी, सतक येथे पूर्वेक्षणाचे काम सुरु आहे. तसेच जवाहरलाल नेहरु एल्युमिनीयम रिसर्च डेव्हलपमेंट ॲन्ड डिझाईन सेंटर तर्फे बॉक्साईट खनिजावर पूर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याच्या अहवालानुसार खनिज लिलावामध्ये समावेष करण्यासाठी जेएनएआरडिडिसी व भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपयोजना केंद्र (एमआरएसएसी) तर्फे वेकोलीच्या खानींचे सॅटेलाईट सर्वेक्षण करुन नकाशावर आरेखन तसेच खरिप व रब्बी पिकांची नुकसान भरपाई संदर्भात सॅटेलाईट नकाशांचा अभ्यास करण्यात आला आहे. ही संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली असल्याची माहिती अजय देशपांडे यांनी दिली.
वेस्टर्न कोलफिल्ड (वेकूली) तर्फे मागील वर्षी २० खानीमध्ये ६८ हजार ८३०.१० मिटर आवेदन करण्यात आले असून यावर्षी ४० खानीमध्ये १ लाख ७३ हजार ८२४.७० मिटर आवेदन प्रस्तावित असल्याची माहिती ओम दत्ता यांनी दिली.
खनिजाचा लिलाव करतांना जास्तीत-जास्त महसूल गोळा करण्याच्या दृष्टिने सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता महासंचालक टि.आर.के. राव यांनी केली. जेएनएआरडिडिसी यांच्याकडे असलेले बॉक्साईट खनिजांचे अहवाल तसेच कृत्रिम बुद्धिमत्ते संदर्भात प्रशिक्षण आयोजित करुन बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात यावी. तसेच शाश्वत विकासाकडे विशेष लक्ष देण्याची सूचना अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल यांनी दिली.
या बैठकीस भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जीएसआयचे उपमहानिदेशक बिभास सेन, आयबिएमचे राम थापर, जीएमपीडीआयचे वरिष्ठ व्यवस्थापक ओम दत्त बिजानी, सीएमडिपीआयचे व्यवस्थापक आर कार्तिकेयन, वंदित व्यास, अजय देशपांडे, श्रीराम कडू, एस.पी. आवळे, रोशन मेश्राम, वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय जोशी , वैज्ञानिक विशाल धांडे, अर्पण गजबे, राहूल राठोड, ऋषिकेश डांगे, सचिन खरबड, शिवराम सानप, मंगेश मोरे, सुशिल राजपूत तसेच भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक आदी उपस्थित होते.
00000
Thursday, 12 September 2024
कापूस आणि तूर पिकांवरील किडी व रोग व्यवस्थापनासाठी कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला
नागपूर,दि.12: राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे कपासी पिकावर आकस्मिक मर (पॅरा वील्ट) रोग दिसून येत आहे. तूर पिकावरील खोड माशी, सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा अळी, मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी आदींच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागातर्फे सल्ला देण्यात आला आहे.
मोठ्या पावसामुळे जमीनीत आद्रता निर्माण झाल्याने आणि साचलेल्या पाण्यामुळे आकस्मिक मर विकृतीचा प्रादुर्भाव कापूस पिकावर दिसून येते यामुळे झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम सुकल्यासारखे दिसते. अशात आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या पिकावर प्रदीर्घ पाण्याचा तान पडू देऊ नये तसेच अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही व साचलेले पाणी त्वरित शेताबाहेर काढण्याच्या सूचना कृषी विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा आणि मर रोगाचे लक्षण झाडाच्या मुळाशी आढळल्यास कॅापर ऑक्सीक्लोराइड (२५ ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझीम (१० ग्रॅम) + युरिया (२०० ग्रॅम) १० लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडास २५०-५०० मिलीची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २% डीएपी (२०० ग्रॅम/ १० लि. पाणी) हलके पाणी देऊन आळवणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तूर पिकावरील खोड माशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी ५% निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट ३०% १५ मिली १० लिटर पाण्यातूंन फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भावाचा अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मिटर अंतरावर शेतात उभारण्याच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.
सोयाबीन पिकामध्ये स्पोडोप्टेरा अळीचा उपद्रव टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे वापरावे. मका पिकावर १०% पेक्षा जास्त अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५% एस. सी. ०.४ मिली प्रति लिटर पाणी किंवा स्पीनोटोराम ११.७% एस. सी ०.५ मिली प्रति लिटर किंवा इमामेक्टिन बेंझोंएट ५% एस. जी. ०.४% ग्रॅम प्रति लिटर पाणी वापरुन फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भुईमूग पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी फ्लुबेन्डामाइड ३.५% + हेक्साकोनॅझोल ५% डब्ल्युजी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी तर भात पिकावरील तपकिरी आणि हिरव्या तुडतुड्यांपासून पिकाचे संरक्षण करण्याकरिता फिप्रोनिल ५ % एस. सी २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
000000
Monday, 9 September 2024
दूध उत्पादकांकरिता अनुदान योजनेची 30 सप्टेंबर मुदत
राज्य शासनाकडून 540 कोटींची तरतूद
नागपूर, दि. 9 : दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता येत्या 30 सप्टेंबर पर्यंत अनुदान योजना कार्यरत असून दूध भुकटी निर्यात प्रकल्प, भुकटी उत्पादक दूध प्रकल्प आणि दूध उत्पादक सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यासर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास विभाग अधिकारी एस.एल. नवले यांनी केले आहे.
राज्यातील सहकारी दूध संघ तसेच खाजगी दूध प्रकल्पांना गाय दुधाचा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना शासनातर्फे 5 रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान योजना 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आली आहे. तसेच दूध भुकटी निर्यात प्रकल्पांकरिता प्रति किलो 30 रु. आणि दूध भुकटी उत्पादक प्रकल्पांसाठी प्रति लिटर 1.50 रु. प्रोत्साहनपर अनुदान जाहीर झाले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सॉफ्टवेयरध्ये डेटा भरणाऱ्या दूध उत्पादक सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना प्रति लिटर 0.05 पैसे इतके प्रोत्साहनपर अनुदान जाहीर झाले आहे.
या योजनेच्या कालावधीकरिता राज्य शासनाकडून 540 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्पांना बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेयर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दूध उत्पादकांनी दुभत्या जनावरांची माहिती प्रकल्पामार्फत पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. या याजनेत दूध उत्पादकांनी प्रकल्पामार्फत सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुदान योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी अथवा प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, नागपूर येथे संपर्क करता येणार आहे.
000000
विभागीय लोकशाही दिनात 3 तक्रारी प्राप्त
नागपूर, दि. ९: विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी प्राप्त झाल्या. उचित कार्यवाहीचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधीत शासकीय यंत्रणांना दिले.
भंडारा जिल्ह्याच्या मांडवी तालुक्यातील कोटांगले येथील नागरिकाची नैसर्गिक नाला व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत जुन्या तक्रारी आणि नागपुरातील गांधी झोन मधील अतिक्रमणाबाबत दोन तक्रारींवर आज सुनावणी झाली.
भंडारा जिल्ह्याच्या तक्रारीवर येत्या महिनाभरात कार्यवाही करून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागपूर महानगरपालिकेबाबत प्राप्त प्रकरणात शासकीय नियम व नोंदीच्या आधारे अहवाल स्वीकारण्यात आला. या प्रकरणातील उर्वरित विषय नझुल जागेवरील अतिक्रमणाचा असल्याने ही तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर या दोन्ही प्रकरणातील तक्रारदार अनुपस्थित होते.
0000
Thursday, 5 September 2024
सारथीतर्फे युवक-युवतींकरिता कृत्रिम रेतन व मुरघास प्रशिक्षण
१८ सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार
नागपूर, दि.५: ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ पुणे, (सारथी) यांच्यातर्फे पुणे व नाशिक येथे मोफत कृत्रिम रेतन व मुरघास प्रशिक्षणाकरिता १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत कुणबी-मराठा या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवतींना पुणे व नाशिक येथे मोफत कृत्रिम रेतन व मुरघास प्रशिक्षणाकरिता अर्ज करता येणार आहे. या प्रशिक्षणांतर्गत एक दिवसीय मुरघास निर्मिती प्रशिक्षणासाठी तालुक्यातील प्रमुख ठिकाण, कृत्रिम रेतन ३० दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी पुणे, पेठ-नाशिक आणि ६० दिवसीय कार्यानुभव प्रशिक्षणासाठी तालुक्यातील प्रमुख ठिकाण नेमण्यात आले आहे. सदर उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अर्ज करण्यासाठी १८ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या उपक्रमासंदर्भात विस्तृत माहिती सारथीच्या http://sarthi-maharashtragov.in
या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून या संधीचा फायदा घेत लक्षित गटातील जास्तीत-जास्त युवक-युवतींनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, नागपूर सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.
00000
संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी १०९८ हेल्पलाईन क्रमांक
‘येता संकट बालकावरी १०९८ मदत करी’
नागपूर, दि. 5: संकटग्रस्त बालकांना त्वरित मदत पुरविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ कार्यान्वित केला असून या सेवेचा संकटग्रस्त बालक किंवा या बालकास मदत करणाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभाग-नागपुरचे विभागीय उपायुक्त ऐ.जे. कोल्हे यांनी केले आहे.
बाल कामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरविलेली बालके, सापडलेली बालके, मतदीचे आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास त्यांना त्वरित आवश्यक मदत पुरविण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. संकटग्रस्त बालकांना त्वरित मतदतीकरिता केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ० ते १८ वर्ष वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी ही चाईल्ड हेल्पलाईन सेवा कार्यारत आहे.
000000
Subscribe to:
Posts (Atom)