Saturday, 31 January 2026

विभागीय आयुक्त कार्यालयात संत रविदास महाराज यांना अभिवादन

 


नागपूर, दि. १ : संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

 विभागीय आयुक्त कार्यालयातील नितीन डोईफोडे, गजानन भोपाळे, अमित हाडके, कविता फाले-बोरीकर आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

                                                                                              

       00000

 


Thursday, 29 January 2026

विभागीय आयुक्त कार्यालयात हुतात्म्यांना श्रद्धांजली

 

 

नागपूर, दि. 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व कामे व हालचाल बंद ठेवून दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली.

     विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आणि इमारत परिसरात आयोजित कार्यक्रमात प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार, पुनर्वसन सहआयुक्त विजया बनकर, नियोजन उपायुक्त अनिल गोतमारे, मागासवर्ग कक्षाच्या उपायुक्त डॉ. हंसा मोहने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

०००००


उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.


याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ,  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे,  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,  मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरजजी चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.


प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश आगरवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी शांतपणे रांगेत उभे राहून  श्रद्धांजली अर्पण केली.

        00000

Wednesday, 28 January 2026

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बारामती येथील बारामती विमानतळावर आगम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवरांसह बारामती येथील विद्याप्रतिष्ठानकडे प्रयाण.




 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बारामती येथील बारामती विमानतळावर आगम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवरांसह बारामती येथील विद्याप्रतिष्ठानकडे प्रयाण.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी बारामती येथील विमानतळावर हेलिकॉप्टरने आगमन झाले.


 राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी बारामती येथील विमानतळावर हेलिकॉप्टरने आगमन झाले.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी बारामती, पुणे येथे आगमन झाले.


 


राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी बारामती, पुणे येथे आगमन झाले.

Tuesday, 27 January 2026

नागपुरला वैद्यकीय व वेलनेस पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी चर्चा महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत विभागीय यंत्रणांमध्ये समन्वयासाठी बैठक

 

 

नागपूर, दि.27 : महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत नागपुरला उच्च दर्जाचे वैद्यकीय व वेलनेस पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी विभागस्तरीय यंत्रणांमध्ये धोरणात्मक समन्वय, प्रशासकीय सुलभता, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि आंतरविभागीय समन्वयाकरिता विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी                     डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महास्ट्राईड, महाराष्ट्र वैद्यकीय पर्यटन सेवा लिमिटेड, पर्यटन विभाग, कौशल्य विकास विभाग आदिंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वैद्यकीय  क्षेत्रातील  शासकीय व खाजगी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत नागपूर मध्ये असलेली विद्यमान वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटल्सद्वारे परदेशी विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारे वैद्यकीय अभ्यासक्रम, परदेशातून उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांसाठी लागणारी आवश्यक सुविधा, हॉस्पिटल्स व रुग्णांकरिता सुलभ नियमावली तयार करणे, नर्सिंग महाविद्यालयांची गुणात्मक सुधारणा करणे, औषध निर्माण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी उपचार पद्धती, आवश्यक कुशल मनुष्यबळ आदिंविषयांवर सविस्तर चर्चा झाली.

नागपुरला वैद्यकीय व वेलनेस पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याकरिता आवश्यक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करणे, परदेशी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करणे, परदेशी विद्यार्थ्यांना नागपुरमधील हॉस्पिटल्समध्ये इन्ट्रन्सीप देणे, वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घ्यावा आदी सूचना यावेळी विभागीय आयुक्त बिदरी यांनी केल्या. वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी नागपुरातील वैद्यकीय क्षेत्राची बलस्थाने व अडचणी मांडल्या. तत्पूर्वी, महाराष्ट्र वैद्यकीय पर्यटन सेवा लिमिटेडच्यावतीने सादरीकरण करण्यात आले, तर महास्ट्राईडचे विभागीय आयुक्त कार्यालयातील समन्वयक अजय कुमार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

राज्यशासनाद्वारे जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्हयांच्या सक्षम विकासासाठी संस्थात्मक क्षमता विकसित करण्याकरिता महास्ट्राईड प्रकल्प राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नागपूर शहरातील सक्षम आरोग्यसेवा परिसंस्था, कुशल वैद्यकीय मनुष्यबळ, शैक्षणिक संस्था आणि भक्कम दळणवळण व्यवस्था आदिंचा लाभ घेवून महाराष्ट्र वैद्यकीय पर्यटन सेवा लिमिटेडच्या साहाय्याने नागपुरला वैद्यकीय व वेलनेस पर्यंटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने ही पहिली बैठक आयोजित करण्यात आली.

 

00000


Friday, 23 January 2026


 24 ओर 25 जनवरी को नांदेड में  मोदी मैदान में हिंद ही चादर गुरुतेग बहादुर साहिब जी के ३५० वे शहिदी समागम का आयोजन हो रहा है.


#sindhi #sindhionism

#sindhiculture

#sikhism

"हिंद दी चादर" के सम्मान में, २४ ओर २५ जनवरी को पूरा देश नांदेड़ के मैदान में !

 श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम के ऐतिहासिक अवसर पर आप सभी सादर आमंत्रित हैं। 24-25 जनवरी 2026 स्थानः मोदी मैदान, नांदेड़ विशेष उपस्थितिः प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, गृह मंत्री श्री अमित शाह जी, और योगी आदित्यनाथ जी। आइए, धर्म और मानवता के रक्षक को नमन करें।


#hinddichadar #GuruTegBahadurSahib #ShahidiSamagam 

#guruteghbahadursahibjii #nanded #maharashtra less

"हिंद दी चादर" के सम्मान में, पूरा देश नांदेड़ के मैदान में!


 

इतिहास गवाह बनेगा जब लाखों श्रद्धालु "हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम में एक साथ शीश झुकाएंगे। मोदी मैदान, नांदेड़ में भव्य तैयारियां पूरी हो चुकी हैं।


विशेष आकर्षणः


भव्य कीर्तन दरबार और गुरु इतिहास प्रदर्शनी.


24 घंटे लंगर और मुफ्त बस सेवा.


केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और संत समाज की विशेष उपस्थिति.


आइए, धर्म और मानवता के रक्षक को नमन करें।


स्थान: मोदी


मैदान, नांदेड़ |


दिनांक : 24-25 जनवरी


#hinddichadar #GuruTegBahadurSahib  #nanded #maharashtra

#हिंद_दी_चादर #


 #हिंद_दी_चादर #गुरूतेगबहादुर यांचा ३५०वा शाहिदी समागम नांदेड येथे  होणार आहे असून या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्यात

विशेष वृत्त बेवारस रुग्णांना मिळाले आप्त मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागाचा पुढाकार




 बेवारस म्हणून दाखल झालेल्यांपैकी अनेकांना गेल्या वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेड़िकल) समाज सेवा विभागाने त्यांचे आप्त मिळवून दिले आहेत.


           मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये विदर्भच नव्हे, तर शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेंलगणा या राज्यांतूनही मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून परिसर सौंदर्यीकरणासहच रोबोटिक सजर्रीसारख्या  अत्याधुनिक आरोग्य सुविधा येथे उपलब्ध आहेत. कोणीही व्यक्ती पैसे नाही म्हणून उपचाराशिवाय राहू नये, हा मुख्यमंत्र्यांचा या मागील उद्देश आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचा मोठा फायदा होत आहे.


      रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळलेल्या रुग्णांचे मेडिकल तर हक्काचे स्थान आहे. पोलिस किंवा  सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते अशा रुग्णांना येथे दाखल करीत असतात. आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून अशा रुग्णांवर उपचार केले जातात. या  रुग्णांवर उपचार झाले की त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी येथील सामाजिक सेवा विभागाची असते. यातील अनेक रुग्ण आरोग्य योजनांच्या निकषात बसत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरील उपचरांसाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद हा सामाजिक सेवा विभाग करीत असतो. त्यासाठी विविध सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती यांना या विभागातर्फे आर्थिक मदतीचे आवाहन केले जाते. 

        

        उपचार सुरू असतानाच या रुग्णांच्या नातेवाईकांचा शोध सुरू होतो. त्यांना शोधणे अतिशय जिकिरीचे असते. कारण अनेकदा  रुग्ण बोलण्याच्या स्थितीत नसतात, काही रुग्ण बाहेरील राज्यांतील असले, तर वेगळ्या भाषेमुळे त्यांच्याशी संवाद साधता येत नाही. मात्र या अडथळ्यांवर मात करीत या रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांकडे पोहचविण्याचे काम सामाजिक सेवा विभाग करीत असतो. २०२५ या वषर्भरात अशा जवळपास चाळीस रुग्णांना त्यांच्या कुटुंबात पोहचविण्यात आले. मात्र शोध घेऊनही ज्यांचे नातेवाईक सापडत नाही, अशांचे पुनर्वसन सामाजिक संघटनांच्या मदतीने करण्यात येते. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही अशाच संघटनांच्या माध्यमातून पार पाडली जाते.


ही आमची जबाबदारी- डॉ अविनाश गावंडे


      कोणीही वाली नसलेले असे ८ ते १० रुग्ण दर महिन्यात मेडिकलमध्ये दाखल होत असतात. त्यांच्यासोबत कोणी घरचे नसल्याने त्यांना भावनिक आधार द्यावा लागतो. बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांचे पुनवर्सन करणे ही आमची जबाबदारी आहे. राज्य शासनातर्फे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. बरे होऊन हे रुग्ण जेंव्हा आपल्या घरी जातात, तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो ,असे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूरचे वैद्यकीय अधीक्षक,  डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले आहे.

                                                                            ००००००

नागपूर जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर


 


नागपूर, दि. 23 : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी शासकीय आदेशाद्वारे नागपूर जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

 या आदेशानुसार शुक्रवार,11 सप्टेंबर 2026 रोजी ‘तान्हा पोळ्या’ची, शुक्रवार ,18 सप्टेंबर 2026 रोजी ‘महालक्ष्मी पुजन’ (ज्येष्ठ गौरी पुजन) आणि बुधवार ,14 ऑक्टोबर 2026 रोजी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’ची सुट्टी नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना जाहीर करण्यात आली आहे. हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष (बँक)यांना लागू राहणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

00000

52व्या ‘ग्रंथभेट’ योजनेसाठी ग्रंथ पाठविण्याचे लेखक व प्रकाशकांना आवाहन


 

 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण कोलकाता व राज्यशासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ‘ग्रंथभेटयोजनेअंतर्गत वर्ष 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील  प्रथम  आवृत्ती  ग्रंथांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पाठविण्याचे आवाहन, नागपूर शासकीय विभागीय ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल रामदास साठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे .

 

     ‘ग्रंथभेट’ योजनेंतर्गत खरेदी करण्यात  येणाऱ्या ग्रंथाची निवड करण्यासाठी तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरून प्रसिद्ध होणाऱ्या शासनमान्य ग्रंथ निवड यादीमध्ये समावेश होण्याच्यादृष्टीने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती  असलेल्या  ग्रंथांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रत ही ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यानंतर पाठविण्यात येणाऱ्या ग्रंथांचा निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही,असेही नमूद करण्यात आले आहे.

 

        या योजनेसाठी वर्ष 2025 मध्ये प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापुर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा ग्रंथ पाठविण्याची आवश्यकता  नसल्याचे  संचालनालयाने  कळविले आहे. मुद्रण व नोंदणी अधिनियम,1867 आणि ग्रंथ प्रदान अधिनियम 1954नुसार प्रकाशकाने या योजनेसाठी पाठवायच्या ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत  राज्य  मध्यवर्ती ग्रंथालय नगरभवन मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. ग्रंथ पोहचल्याची पोच पावती घेवून ग्रंथालय संचालनालयाकडे पाठविण्यात येणाऱ्या ग्रंथासोबत ही पोचपावती टपालामार्फत किंवा समक्ष पाठविण्यात यावी असेही सांगण्यात आाले आहे.

                                                0000

Thursday, 22 January 2026

#हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा (15)




शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या निधनानंतर १६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून गादीवर बसविण्यात आले. त्यांनी स्वतःसाठी शिवालिक पर्वतराजीत एक नगर वसविले आणि तिथे आपली गादी स्थापून ते धर्मप्रचारासाठी यात्रा करू लागले.


#Hinddichadar

मुख्य सचिवांनी घेतली विविध विभागांची बैठक





नागपूर, दि. 22 : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात विविध विभागांची बैठक घेतली. 


        हिवाळी अधिवेशनानंतर प्रथमच नागपूर भेटीवर आलेल्या मुख्य सचिवांचे स्वागत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरीक्त आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजूसिंग पवार, अपर आयुक्त महसूल राजेश खवले आणि माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.


         श्री. अग्रवाल यांनी नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रो,महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (एमआरएसएसी),पुरातत्व विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभागांची बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला.

          ००००००

Subject: Witness History in Nanded! "Hind-Di-Chadar" 350th Martyrdom Commemoration


 Subject:  Witness History in Nanded! "Hind-Di-Chadar" 350th Martyrdom Commemoration




Discription: The historic land of Nanded is all set to host the grand commemoration of Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji's 350th Martyrdom. Organized by the Government of Maharashtra and Takhat Sachkhand Sri Hazur Sahib, this event is a tribute to the supreme sacrifice made for the protection of Dharma.


Distinguished Guests: Union Home Minister Shri Amit Shah Ji, Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, UP CM Yogi Adityanath Ji, and other eminent leaders.


Spiritual Presence: Seek blessings from Sant Giani


Harnam Singh Khalsa, Pt. Dhirendra Krishna Shastri (Bageshwar Dham), H.B.P. Sanjay Maharaj Pachpor, and many other revered saints.


Come, let us be witnesses to this great saga of valor!


Date: January 24th & 25th, 2026


Venue: Modi Ground, Vaghala, Nanded clock Time: 8:00 AM to 10:00 PM


#hinddichadar #Guru Teg BahadurSahib #guruteghbahadursahibji #ShahidiSamagam #nanded #maharashtra

नांदेड में आयोजित होने वाले #हिंद_दी_चादर


 नांदेड में आयोजित होने वाले #हिंद_दी_चादर 


कार्यक्रम की सफल एवं शांतिपूर्ण व्यवस्था हेतु आज जिलाधिकारी, जिला दंडाधिकारी, एवं सभी आयोजकों व समिति सदस्यों के साथ एक महत्वपूर्ण बैठक.


#maharashtra #viral #minorities #hinddichadar

Wednesday, 21 January 2026

'हिंद-दी-चादर' या भव्य कार्यक्रमाचे ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी कौतुक केले आहे


 


श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त नांदेडमध्ये आयोजित 'हिंद-दी-चादर' या भव्य कार्यक्रमाचे ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी कौतुक केले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासन आणि विशेषतः श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार मानले आहेत.


आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा हा वारसा अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहावे.


स्थळ: मोदी मैदान, वाघाळा, नांदेड.


दिनांक: २४ आणि २५ जानेवारी. सायं. ६ ते रात्री १० वाजेपर्यंत.


#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji #rameshwarnaik #ShahidiSamagam  #nanded

#maharashtra

#हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा(14)


 #हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा(14)

तेगबहादुरांचा जन्म अमृतसर येथे झाला. त्यागमल हे त्यांचे मूळ नाव.वयाच्या ८व्या वर्षी कर्तारपूर येथील लालचंदजी खत्री यांची कन्या गुजरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.गृहस्थ असूनही ते वडिलांच्या मृत्युनंतर बकाला येथे जाऊन विरक्तवृत्तीने राहू लागले.

सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड़ वही स्थान है जहाँ दशम पिता श्री गुरु गोबिंद सिंह जी ने अपने अंतिम क्षण बिताए और एक ऐतिहासिक निर्णय लिया।


 सरदार डॉ. विजय सतबीर सिंह जी बता रहे हैं कि सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड़ वही स्थान है जहाँ दशम पिता श्री गुरु गोबिंद सिंह जी ने अपने अंतिम क्षण बिताए और एक ऐतिहासिक निर्णय लिया।


यहीं पर गुरु साहिब ने देहधारी गुरु परंपरा को समाप्त कर, श्री गुरु ग्रंथ साहिब जी को युगों-युगों के लिए 'गुरु' घोषित किया।


आइए, इस महान इतिहास को नमन करें और 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम में शामिल हों।


 24-25 जनवरी, 2026 स्थानः मोदी मैदान, वाघाला,नांदेड.


#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji  #ShahidiSamagam #CMOMaharashtra  #nanded #maharashtra

प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी समन्‍वयाने कार्य करावे - अपर आयुक्त तेजूसिंग पवार



 

     

नागपूर ,दि.२१ : ७७व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम २६ जानेवारी रोजी येथील  कस्तुरचंदपार्क मैदानावर होणार आहे .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्‍वयाने कार्य करावे, अशा सूचना विभागीय आयुक्तालयातील  अपर आयुक्त सामान्य प्रशासन, तेजूसिंग पवार यांनी आज येथे दिल्या.

 

      आयुक्तालयातील सभागृहात  श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

      प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमावेळी होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा क्रम, यासंदर्भात संबंधित विभागाकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी यांची माहिती घेण्यात आली. सर्व विभागांनी समन्‍वयाने व चोखपणे जबाबदाऱ्या पार पाडणाच्या सूचना श्री. पवार यांनी दिल्या. येत्या २४ जानेवारी रोजी कस्तुरचंद पार्क मैदानावर मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस विभाग, सर्वजनिक बांधकाम ,महानगरपालिका,अग्नीशमन विभाग, विविध शाळा, क्रीडा विभाग आदिंचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

           ००००००

Tuesday, 20 January 2026

#हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा (13)


 #हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा (13)

शीख धर्मियांचे मार्गदर्शक दहा गुरु आहेत. यापैकी दोन गुरु हे तेग बहादुरांचे आप्त आहेत. गुरु तेगबहादुर हे शिखांचे नववे गुरू असून सहावे शीखगुरू #हरगोविंद यांचे ते सर्वात धाकटे पुत्र व शिखांचे दहावे व शेवटचे #गुरूगोविंदसिंह यांचे ते पिता होत.

#हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा (12)


 #हिंद_दी_चादर यांची #शौर्यगाथा (12)

#भाईलखीशाहबंजारा यांनी #रकाबगंज गावातील त्यांच्या राहत्या घरी गुरू तेगबहादुरांच्या पवित्र अस्थी पुरल्या आज तिथेच संसद भवनाच्या मागील भागात #रकाबगंजगुरुद्वारा स्थित आहे.