* तात्पुरत्या कॅम्पसमध्ये ट्रीपल आयटी सुरु
* जागेचे हस्तांतरण पूर्ण बांधकामाला सुरुवात
* जिल्हाधिकाऱ्यांचे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती
नागपूर, दि. 3 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फारमेशन टेक्नॉलॉजी या महत्वपूर्ण संस्थेला जागेचे हस्तांतरण करण्यात आले असून विकास कामांसाठी 4 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तात्पुरत्या कॅम्पसमध्ये यावर्षी पासूनच प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हैद्राबाद हाऊस येथे इंडियन इंस्टिट्युट ऑफ इन्फारमेशन टेक्नॉलॉजी संस्था सुरु करण्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सिताराम कुंटे, ट्रीपल आयटीचे असोशिएट डीन डॉ.ए.जी.कोठारी, प्रबंधक के.एन.डाखले आदी उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञान संस्थेस आवश्यक असलेल्या जागेतील हस्तांतरण करण्यात आले असून बीएसएनल या संस्थेच्या परिसरात ही संस्था सुरु झाली असून पहिल्यावर्षीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या संस्थेसाठी आवश्यक असलेले 9 विभाग प्रमुखांच्या नियुक्त्यांही झाल्या आहेत. तात्पुरत्या कॅम्पस परिसरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून या संस्थेच्या निर्मितीसाठी शासनातर्फे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. संस्थेच्या बांधकामासोबत येणाऱ्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
प्रारंभी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव प्रभाकर कुंटे यांनी ट्रीपल आयटी संदर्भात शासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधा संदर्भात माहिती दिली. या संस्थेत 80 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून टीसीएस, एडीसीसी आदी संस्थांचाही सहभाग असल्याचे यावेळी सांगत आले.
अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी व्हीएनआयटी मेन्ट्रा
नागपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी मेन्ट्रा म्हणून व्हीएनआयटी राहणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसर तसेच क्लासरुम डिजिटल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. अभियांत्रिकी महाविद्यालयात पाच अभ्यासक्रमांद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून 74 पदांना मंजूर देण्यात आली असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी व्हीएनआयटीचे संचालक डॉ.जामदार उपस्थित होते.
*******


No comments:
Post a Comment