Friday, 17 March 2017

राज्य अर्थसंकल्पाचे संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण

मुंबई दि. 17: राज्याचा सन 2017-18 सालचा अर्थसंकल्प उद्या दि. 18 मार्च 2017 रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दुपारी 2.00 वाजता सादर होईल. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.

अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण  http://www.mahafinance.co.in/live  या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अर्थसंकल्पावर शेवटचा हात

मुंबई दि. 17: राज्य विधिमंडळात उद्या दि. 18 मार्च 2017 रोजी राज्याचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प सादर होईल. तत्पूर्वी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज दि. 17 मार्च 2017 रोजी अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवला.
000

No comments:

Post a Comment