Monday, 17 April 2017

जलयुक्त शिवार अभियानाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

  • जिल्हास्तरावर सोलापूर, तालुकास्तरावर पुरंदर, गावपातळीवर मळेगांव राज्यात प्रथम क्रमांक
  • वृत्तपत्र पत्रकार अविनाश कदम, दैनिक पुण्यनगरी, पुणे प्रथम क्रमांक
  • इलेक्ट्रॉनिक्स मिडीयात रविंद्र कांबळी, सांगली प्रथम क्रमांक
  • वैयक्तीक पुरस्कार संजय शिंदे, निकनूर, ता. जि. बीड प्रथम क्रमांक
  • सामुदायिक अशासकीय संस्था पुरस्कार संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड प्रथम क्रमांक
  • जिल्हाधिकारी स्तरावर सोलापूर जिल्हाधिकारी प्रथम क्रमांक
मुंबई, दिनांक 15- राज्यात जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्हयांना तर तालुकास्तरावर पुरंदर, कोरेगांव सातारा, चांदवड आणि गांव पातळीवर मळेगांव, वेळू, कर्जत या गांवाना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे सन 2015-16 चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविले जावे यासाठी शासनाने  2015-16 पासून या अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हा, तालुका, गांव, व्यक्ती/वैयक्तिक संस्था, अधिकारी/कर्मचारी, पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडीयासाठी राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, तर जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आज राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.
राज्यस्तरावर जाहिर झालेले पुरस्कार, पुरस्कार विजेते व बक्षिसाची रक्कम -   
गाव -
प्रथम : मळेगांव, ता.बार्शी, जि. सोलापूर, रु. 25 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
द्वितीय : वेळू, ता. कोरेगांव, जि. सातारा, रु. 15 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
तृतीय : कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर, रु. 7.5 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.

तालुके -
प्रथम : ता. पुरंदर, जि. पुणे, रु. 35 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
द्वितीय : ता. कोरेगांव, जि. सातारा, रु. 20 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
तृतीय : ता. चांदवड, जि. नाशिंक, रु. 10 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
जिल्हे -
प्रथम  : सोलापूर जिल्हा, रु. 50 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
द्वितीय : पुणे जिल्हा , रु. 30 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
तृतीय : अहमदनगर जिल्हा, रु. 15 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
वैयक्तिक पुरस्कार -
प्रथम : श्री. संजय ज्ञानोबा शिंदे, निकनूर, ता. जि. बीड, रु. 50 हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
द्वितीय : श्री. सुभाष उत्तमराव नानवटे, रा. दोडकी, ता. जि. वशिम, रु. 30 हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
सामुदायिक/अशासकीय संस्था पुरस्कार -
प्रथम : संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड, रु. 1.50 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
द्वितीय : आर्ट ऑफ लिव्हिंग सेवाभावी संस्था, जालना, रु. 1 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
वृत्तपत्र पत्रकार पुरस्कार -
प्रथम : श्री. अविनाश अंकुशराव कदम, दै.पुण्यनगरी, पुणे, रु. 50 हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
द्वितीय : श्री. संदिप दत्तु नवले, ॲग्रोवन, अहमदनगर, रु. 35 हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
तृतीय : श्रीमती संगिता हनुमंतराव भापकर, दै. सकाळ, बारामती, जि. पुणे रु. 25 हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
इलेक्ट्रॉनिक मिडिया पुरस्कार -
प्रथम : श्री. रविंद्र शिवाजी कांबळे, सांगली, रु. 1 लाख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र .
द्वितीय : श्री. शशांक रमेश चौरे, अमरावती, रु. 71 हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
तृतीय : श्री. शशिकांत पाटील, लातूर, रु. 51 हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी -
श्री. वि. सि. वखारे, सहसचिव, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
श्री. ना. श्री. कराड, अवर सचिव, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
श्री. शंकर जाधव, अवर सचिव, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
श्री. सुनिल गवळी, सहायक कक्ष अधिकारी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या जिल्हयांचे जिल्हाधिकारी -
पुणे विभाग - सोलापूर जिल्हाधिकारी (प्रथम), स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
पुणे विभाग - पुणे  जिल्हाधिकारी (द्वितीय), स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
नाशिक विभाग - अहमदनगर जिल्हाधिकारी (तृतीय), स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
विभागस्तरावर प्रथम आलेल्या जिल्हयांचे जिल्हाधिकारी -
कोकण विभाग - ठाणे जिल्हाधिकारी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
नाशिक विभाग - अहमदनगर जिल्हाधिकारी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
पुणे विभाग - सोलापूर जिल्हाधिकारी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
औरंगाबाद विभाग - उस्मानाबाद जिल्हाधिकारी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
अमरावती विभाग - अमरावती जिल्हाधिकारी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
नागपूर विभाग - नागपूर  जिल्हाधिकारी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
या पुरस्कारांची निवड करण्यासाठी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने या पुरस्कारांची निवड केली आहे.  
000

विलास बोडके/विसंअ/15/4/17

No comments:

Post a Comment