मुंबई, दि. 6 : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अवैध बांधकामाच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. अवैध बांधकाम प्रकरणामध्ये अधिकारी, विकासक तसेच अन्य कोणाचाही समावेश आढळल्यास त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.
वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रातील अवैध बांधकाम प्रकरणासंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील बोलत होते.
डॉ. पाटील म्हणाले की, वसई- विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अवैध बांधकामासंदर्भात तक्रार आल्यावर त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल पालिकेकडे मागविण्यात आला होता. अहवालात विकासकाने अतिरिक्त अनधिकृत बांधकाम केले असल्याचे आढळून आले आहे. म्हणून या प्रकरणातील संबंधितांवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांच्या कलम 419,420,67,68,71 अंतर्गत कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करुन याची आयुक्त किंवा उपसचिवांकडून सखोल चौकशी करुन, बांधकाम जेव्हापासून चालू करण्यात आले. तेव्हापासून यामध्ये जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment