मुंबई.दि, 6 : रायगड जिल्ह्यातील माणगांव विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात तसेच तेथील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे - पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.
रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील विळे- भागाड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा संदर्भात (एमआयडीसी) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. पोटे-पाटील बोलत होते.
स्थानिक लोकांनी प्रदूषणासंदर्भात केलेल्या तक्रारींवरुन संबंधित पास्को महाराष्ट्र स्टील या कंपनीला नोटीस देण्यात आली आहे. या कंपनीसोबत महामंडळाने करार केला असून, त्यानुसार पात्र उमेदवारांना कुशल व अकुशल कामात प्राधान्याने नोकरी देणे नमूद केले आहे. त्यामध्ये 36 स्थानिक प्रकल्पग्रस्तांना पात्रतेनुसार रोजगाराची संधी दिली आहे. तसेच कंत्राटी पध्दतीने 936 कामगार भरण्यासाठी स्थानिक 3 कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले आहे. या सर्व बाबींवर लवकरच आढावा बैठक घेण्यात येईल, असेही श्री. पोटे-पाटील यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment