Thursday, 3 August 2017

इन्स्पायर अवार्डसाठी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नॉमिनेशन स्वीकारणार

नागपूर, दि. 3 : शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाकडे आकर्षित करताना संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इन्स्पायर अवार्ड मानकासाठी इयत्ता 6 ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे इन्स्पायर अवार्ड देण्यात येणार असून यासाठी शाळांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन व नॉमिनेशन दिनांक 15 ऑगस्टपर्यंत सादर करावे, असे आवाहन राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्थेचे संचालक रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
इन्स्पायर अवार्ड मानकासाठी दरवर्षी संपूर्ण भारतातून 1 लक्ष नाविन्यपूर्ण प्रकल्पाची निवड एनआयएफ अहमदाबाद यांच्या सौजन्याने डीपीएसमार्फत केली जाणार आहे. यामध्ये राज्यस्तर प्रदर्शनासाठी 10 हजार नाविन्यपूर्ण प्रतिकृती तसेच प्रकल्पाची निवड केली जाणार आहे. यापैकी राष्ट्रीय प्रदर्शनात 1 हजार प्रतिकृती, प्रकल्प सहभागी होऊन यापैकी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 60 प्रकल्पाची निवड राजकीय प्रदर्शनासाठी करण्यात येणार आहे.
इन्स्पायर अवार्ड मानक ही योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता 6 ते 10वीच्या सर्वच मान्यताप्राप्त शाळा या योजनेत सहभाग येऊ शकतात. सर्व शाळांना www.inspireaward-dst.gov.inया वेबसाईटवर शाळांचे रजिस्ट्रेशन व ऑनलाईन नॉमिनेशन सादर करता येईल. ऑनलाईन नॉमिनेशन सादर करण्याची 15 ऑगस्ट 2017 ही अंतिम तारीख आहे. या योजनेसाठी राज्य विज्ञान संस्था ही नोडल एजन्सी म्हणून कार्य करीत असून शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षण निरीक्षक हे योजनेकरिता जिल्हा समन्वयक  अधिकारी आहेत. मान्यताप्राप्त शाळांनी 15 ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नॉमिनेशन सादर करावे, असे आवाहन राज्य विज्ञान संस्थेचे संचालक रविकांत देशपांडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment