नागपूर, दि. 23 : महाराष्ट्राचे उपलोकायुक्त डॉ. शैलेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या सुनावणीसाठी नागरिकांकडून एकूण24 तक्रारी स्वीकारण्यात आल्यात. या सर्व नागरिकांच्या तक्रारींवर उपलोकायुक्त डॉ. शैलेश शर्मा यांनी सुनावणी दिली.
नागरिकांच्या तक्रारींच्या सुनावणीच्यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयात महानगर पालिका,नागपूर, जिल्हाधिकारी, नागपूर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, कार्यकारी अभियंता, लघु सिंचन विभाग, जिल्हा परिषद, नागपूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. नागपूर, जिल्हाधिकारी, वर्धा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. वर्धा, मिळकत व्यवस्थापक नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, नागपूर, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, नागपूर, नागपूर पशु वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नागपूर, उपसंचालक, आरोग्य सेवा, मुख्याधिकारी, नगर परिषद अचलपूर, जि. अमरावती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली तहसिलदार, आष्टी, जि. वर्धा तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment