Wednesday, 2 August 2017

भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे संबंधित विभागाच्या आहरण संवितरण अधिकाऱ्यांकडे पाठवली


मुंबई, दि. २ :   भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची २०१६-१७ ची वार्षिक लेखा विवरण पत्रे,  प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी) I , महाराष्ट्र मुंबई कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्याकरिता राज्याच्या संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे  पाठविण्यात आली आहेत. संबंधित वर्गणीदारांनी आपली भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे आपल्या कार्यालयातून प्राप्त करून घ्यावीत,   असे आवाहन  प्रधान महालेखाकार कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.
या वार्षिक विवरणपत्रात जर काही त्रूटी असतील तसेच मिसिंग क्रेडिट किंवा डेबिट दर्शविले असेल तर त्याचे विवरण व ज्या वर्गणीदाराची जन्मतारीख तसेच नियुक्तीची तारीख विवरणपत्रात नमुद केली नसेल तर त्याचा तपशील त्यांच्या आहरण  व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत त्वरीत प्रधान महालेखाकार कार्यालयाकडे सादर करावा म्हणजे त्यात योग्य त्या सुधारणा करून देणे सोयीचे होईल. भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे ऑगस्ट २०१७ पासून इंटरनेटवर सुद्धा वर्गणीदारांच्या सोयीसाठी उपलब्ध असतील. यासाठी संकेतस्थळाचा पत्ताhttp://agmaha.cag.gov.in असा आहे.
००००



No comments:

Post a Comment