Wednesday, 2 August 2017

विधानपरिषद लक्षवेधी : मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या परिसरातील अतिक्रमण काढून सरकारच्या ताब्यात घेणार - पंकजा मुंडे

          मुंबईदि. 2 : मुंबईतील मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या परिसरात असलेली25 एकर भूखंडावर भूमाफीयांनी अतिक्रमण करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे.85 एकर जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. त्यासाठी शासन पाठपुरावा करत असून तेथील जमिनीवरील अतिक्रमण काढून ती जमीन सरकारच्या ताब्यात घेतली जाईल आणि त्याचा वापर अनाथ व अपंग मुलांसाठी केला जाईलअशी माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
           मुंबईतील मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या परिसरात असलेल्या 25 एकर भूखंडावर भूमाफीयांनी केलेल्या अतिक्रमणाबाबतची सदस्य श्रीमती हुस्नबानू खलिफे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होतीत्यावेळी त्या बोलत होत्या.
            श्रीमती मुंडे म्हणाल्याअतिक्रमण झालेल्या जागेवर कार्यवाही होऊन जागा शासनाकडे उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत बैठक घेण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन मिळावे. त्यांची वेळोवेळी परवड होऊ नये म्हणून त्यांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. बालकल्याण योजनेसाठी व मुलांच्या पुनर्वसनासाठी या जागेची संस्थेला आवश्यकता आहे. त्याकरिता जागेच्या भाडेपट्टयाचे नुतनीकरण करुन मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारीउपनगर यांना सादर करण्यात आलेला आहे. त्यावर जिल्हाधिकारीमुंबई उपनगर यांनी 22 जून 2017 रोजी सुनावणी घेऊन सदर प्ररकण निकालासाठी राखून ठेवले आहे.
            या लक्षवेधीमध्ये सदस्य सर्वश्री भाई जगतापप्रवीण दरेकरहेमंत टकलेश्रीमती विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला होता.
००००

No comments:

Post a Comment