मुंबई, दि. 1 : पीकविमा आता बँकांमध्ये ऑफलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. यापुढे पीक विम्यासाठी मुदतवाढ देणे शक्य नसुन, पुढील दोन ते तीन महिन्यात केवायसी करण्यात येईल त्यामुळे शेतक-याला स्वत:च्या खात्यात पैसे भरता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
पिक विम्यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पीक येणार की नाही हे कळल्यानंतर विमा काढता येत नाही. त्यामुळे पुन्हा पीक विम्यासाठी मुदत वाढ देता येणार नाही. पाच ते सहा जिल्ह्यात समस्या उद्भवली असल्याचे आढळून आले आहे. तेथे वाढीव मनुष्य देऊन तातडीने कामे पुर्ण करण्यात येणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने पीक विमा काढण्यात यावा अशा सुचना सर्व संबंधीत बँकांना देण्यात आल्या आहेत. एकाच शेतक-याने विविध बँकांतून पीक विमा घेतला असल्याचे आढळून आले आहे. भविष्यात या समस्या उद्भवू नये यासाठी शेतक-यांचे केवायसी करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतक-यांना स्वत:च्या खात्यात विम्याचे पैसे भरता येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यासंदर्भातील अधिक माहितीही कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
०००
No comments:
Post a Comment