नागपूर दि. 3 : सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गोत्सव आणि शारदोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना वर्गणी गोळा करण्याची परवानगी ऑनलाईन घेणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 अ अन्वये सार्वजनिक मंडळांना वर्गणी गोळा करण्याची परवानगी अर्ज ऑनलाईन भरावयाचा आहे. त्यासाठीcharity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज भरावा. आणि प्रणाली मार्गदर्शनाकरिता कलम 41 क चा वापर करण्याचे आवाहन धर्मादाय सह-आयुक्त आ. सु. कोल्हे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment