नागपूर दि. 3: शासकीय सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता विमाछत्र योजना मार्गदर्शन कार्यशाळा शुक्रवार, दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लेखा कोष भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा जिल्हा कोषागार कार्यालय व एमडी इंडियाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
शासकीय सेवेच्या अंतिम वर्षात पदार्पण केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच 30 जून 2011 नंतर सेवानिवृत्त झालेले निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांच्यासाठी वैद्यकीय योजना सुरू करण्यात आली आहे. विमाछत्र योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी यांच्यामार्फत ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार आहे. त्याकरिता www.mahakosh.in या संकेतस्थळावर नव्याने उपलब्ध करून दिलेल्या विमाछत्र योजना विकल्पाद्वारे Swasthya संकेतांक वापरून वेब फॉर्म भरावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. या कार्यशाळेला आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment