नागपूर, दि. 21
: फेब्रुवारी-मार्च
2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेत
नियमित, पुनर्परीक्षा, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी
तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे आवेदनपत्रे
ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर भरावयची आहेत.
उच्च माध्यमिक शाळा,
कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे नियमित शुल्कासह दिनांक 18
सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर व विलंब शुल्कासह दिनांक
1 ते 17 ऑक्टोबर तर, बँकेत चलनाद्वारे
शुल्क दिनांक 10 ते 17 ऑक्टोबर व विलंब शुल्कासह दिनांक 18 ते 25 ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयाला शुल्क
भरावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह
विद्यार्थ्याच्या नावाची यादी मंगळवार, दिनांक 31 ऑक्टोबर पर्यंत जमा करावयची
आहेत. असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment