Wednesday, 27 September 2017

नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ



        नागपूर दि. 27 :- महिला व बाल विकास क्षेत्राअंतर्गत कार्य करणाऱ्या तसेच कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व अनुदानित, विना अनुदानित, शासकीय, अशासकीय स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
            याकरीता कार्यरत व इच्छुक असणाऱ्या सर्व संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्राचा प्रस्ताव आदर्श नियमावलीमध्ये दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नवीन प्रशासकीय भवन, इमारत क्रमांक 2, सहावा माळा, जिल्हा परिषद जवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे सादर करावा. सदर कालावधी नंतर नोंदणी प्रमाणपत्राशिवाय किंवा नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर न करता कार्यरत राहणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी पत्रकाव्दारे सुचित केले  आहे.
                                                                        ****

No comments:

Post a Comment