Wednesday, 27 September 2017

महादेव उईकेच्या मृत्यूची होणार चौकशी



नागपूर, दि.27 : वन संरक्षणातील बंदी महादेव चैतराम उईकेच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश रामटेक येथील उपविभागीय अधिकारी राम जोशी यांना दिले आहे.
महादेव उईके 18 ऑगस्ट 2017 रोजी कारागृहातून पळाला. त्यानंतर त्याचा 26 ऑगस्ट 2017 रोजी मृतदेह पारशिवनी पोलिस स्टेशनतंर्गत येणाऱ्या शिवारात सापडला. त्यामुळे मृत्यू होण्याची कारणे व परिस्थिती तसेच मृतकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेली इतर संयुक्तिक कारणांचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. अथवा या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छुकांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, रामटेक येथे  5 ऑक्टोबरपूर्वी सादर करावे. असे उपविभागीय दंडाधिकारी राम जोशी यांनी कळविले आहे.
***** 

No comments:

Post a Comment