Monday, 25 September 2017

पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत


               मुंबईदि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात संकल्प स्वच्छतेचा-स्वच्छ महाराष्ट्राचाआणि 'स्वच्छता हीच सेवाया विषयावर कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून मंगळवार  दि.  26 सप्टेंबर आणि बुधवार  दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी 7.25 ते 8.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत हेमंत बर्वे यांनी घेतली आहे तसेच प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही श्री.खोत यांनी उत्तरे दिली आहेत.
          राज्यात दि. २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत 'संकल्प स्वच्छतेचा - स्वच्छ महाराष्ट्राचातर दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर रोजी 'स्वच्छता हीच सेवाहे अभियान राबविण्यात येत आहेया अभियानाचा उद्देशअभियानाचे वेगळेपण,लोकप्रतिनिधीअधिकारी आणि लोकांचा या अभियानात मिळत असलेला सहभागया अभियानाला मिळत असलेले अभूतपूर्व यश आणि शासन करत असलेला प्रयत्न या सर्व विषयावर सविस्तर माहिती श्री. खोत यांनी 'दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. 
००००

No comments:

Post a Comment