Monday, 18 September 2017

'वस्तू व सेवाकर' विषयी आयुक्त राजीव जलोटा'जय महाराष्ट्र'मध्ये

 मुंबई,दि.१८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र ' कार्यक्रमात वस्तू व सेवा कर' या विषयावर राज्याचे वस्तू व सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांची  मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या मंगळवार दि. 19 सप्टेंबर  संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक दीपक वेलणकर यांनी घेतली आहे.
             दिनांक 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात करण्यात आली आहे. वस्तू व सेवा कर आकारणी, सर्वसामान्यांचे वस्तू व सेवा कर विषयीचे प्रश्न, राज्यातील वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी आदी प्रश्नांची उत्तरे श्री. जलोटा यांनी  'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.

००००

No comments:

Post a Comment