नागपूर, दि.20 : महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे राज्यपाल चे
विद्यासागर राव यांचे गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता चेन्नई
येथून नागपूर येथे आगमन होईल. त्यांचा गुरुवारी नागपुरात मुक्काम असेल. शुक्रवार,
दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय
विमानतळ, नागपूर येथे राष्ट्रपती महोदयांच्या स्वागतासाठी उपस्थित राहतील. सकाळी
10.10 ते सायंकाळी 5.15 या वेळेत ते राष्ट्रपती महोदयांच्या विविध कार्यक्रमांना
उपस्थित राहतील. सायंकाळी 5.25 वाजता राष्ट्रपती महोदय नवी दिल्लीकडे प्रयाण करणार
असून त्यानंतर सायंकाळी 5.45 वाजता राज्यपाल चे विद्यासागर राव नागपूर येथून
हैद्राबादकडे विमानाने प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment