नागपूर, दि.20 : सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख
यांचे उद्या गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 9.20 वाजता पुणेहून विमानाने
येथे येतील व मोटारीने कळमना मार्केटकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता कळमना मार्केट,
नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथे व्यापाऱ्यांसोबत बैठकीस उपस्थिती. सकाळी
11.00 वाजता सायंटिफिक हॉल येथे विदर्भातील सहकारी पणन व प्रक्रिया संस्थांच्या
कार्यशाळेस उपस्थिती. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत संचालक वस्त्रोद्योग यांचेसमवेत
बैठक. सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत शिक्षक सहकारी बँक, गांधीसागर येथे शिक्षक
सहकारी बँकेच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 ते 7.45 वाजेपर्यंत शासकीय
विश्रामगृह येथे राखीव. रात्रौ 840 वाजता विमानाने पुणेकडे प्रयाण.
****
No comments:
Post a Comment