Monday, 11 September 2017

लंडनच्या उपमहापौरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट


लंडन आणि महाराष्ट्रातील शहरांमध्ये
विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य
मुंबईदि11 लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यांनी आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतलीयावेळी लंडन आणि महाराष्ट्रातील मुंबईसह इतर शहरांमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा झालीमुंबई शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करणेत्याला कनेक्टिव्हीटी देणारी प्रभावी परिवहन व्यवस्था निर्माण करणेपरवडणारी घरेस्मार्ट सिटी आदी संदर्भात यावेळी चर्चा झाली.
मुख्यमंत्री यावेळी म्हणालेमुंबई शहरात प्रभावी आणि सुलभ परिवहन व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहेयाशिवाय परवडणारी घरे आणि स्मार्ट सिटींची निर्मिती हाही राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहेलंडन शहराने यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्रातील शहरांशी सर्वतोपरी सहकार्य लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल
लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यावेळी म्हणालेलंडन शहरात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी स्वतंत्र चिफ डिजिटल ऑफिसर नेमण्यात आला आहेसध्याच्या मुलभूत सुविधा वापरूनच शहराची डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर देण्यात येत आहेडिजिटल कनेक्टिव्हिटीपरवडणारी घरेसक्षम परिवहन व्यवस्था यासह विविध क्षेत्रात महाराष्ट्रातील शहरांशी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईलदोन्हीकडील वेगवेगळ्या नवकल्पनांचे आदान प्रदान करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डीकेजैननितीन करीर यांच्यासह लंडनमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment