मुंबई, दि. 25 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून आज मंत्रालयात अभिवादन केले.
याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा) आर. ए. राजीव, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव श्रीमती सी. के. वडते यांनीही पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment