Monday, 25 September 2017

‘स्वच्छता हिच सेवा’ राजभवन येथे स्वच्छता अभियान



             मुंबईदि. 25 : स्वच्छता हिच सेवा या अभियानांतर्गत राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आज राजभवन परिसरात स्वच्छता मोहम राबविली. तसेच राजभवन मधील देवीमंदीराजवळ वृक्षारोपण केले.
            या स्वच्छता मोहिमेत राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डीउपसचिव रणजित कुमारपरिवार प्रबंधक वसंत साळुंखेराजभवन मधील अधिकारीकर्मचारी त्यांचे कुटुंबियराज्य राखीव पोलीस दलमुंबई पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.  
            राजभवनचा परिसर सुंदर व स्वच्छ ठेवत असल्याबद्दल तसेच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल राज्यपालांनी यावेळी सर्वांचे कौतक केले.
००००

No comments:

Post a Comment