नागपूर दि.20 वन आणि
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि संरक्षणास चालना देण्यासाठी ग्रीन आर्मी मोबाईल
ऍप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे. मोबाईल
ऍप्लिकेशन महाराष्ट्र वन विभागाच्या संकेतस्थळा सुद्धा उपलब्ध आहे. हे संकेतस्थळ
नगरीकांना समजावून सांगण्यासाठी तसेच हरित सेने बद्दल सविस्तर माहिती मिळण्यासाठी
महत्वाचे ठरत आहे. तसेच सामाजिक व्यासपीठ म्हणून काम करत आहे.
ग्रीन
आर्मी मोबाईल अॅप्लिकेशनमुळे दोन-टप्या मध्ये स्वयंसेवकांना नोंदणीची सहज सोय होईल, टप्पा -१ प्राथमिक माहिती (म्हणजेच नाव, DOB, संपर्क क्र. इत्यादी)
असेल आणि टप्पा -२ नआवडीचे क्षेत्र, स्थान आणि OTP द्वारे सत्यापन होईल. हे मोबाईल
अॅप्लीकेशन नागरीकांना महाराष्ट्र वन विभागाच्या विविध ग्रीन उपक्रमांमधून नोंदणी
आणि जंगलातील संरक्षण, वृक्षारोपण
आणि ट्रेकिंग इत्यादीसारख्या विविध योजनांमध्ये भाग घेण्यास सक्षम करेल. येत्या १३-कोटी आणि ३३ -कोटी वृक्षारोपण रेषेतील नागरीकांना सहभागी होण्यासाठी
महाराष्ट्र वनविभाग आवाहन करीत आहे.
मोबाईल ऍप्लिकेशन महाराष्ट्र वनखात्याच्या
वेबसाइटवर (www.mahaforest.nic.in) आणि ग्रीन आर्मी महाराष्ट्र वेबसाइट (www.greenarmy.mahaforest.gov.in)
वर डाउनलोड
करण्यासाठी उपलब्ध आहे. लवकर गुगल च्या प्लेस्टोर वर उपलब्ध असेल. अप उपलब्ध
झाल्यानंतर हरित सेनेच्या सदस्याची नोंदणी ३.१ दशलक्ष पेक्षा १ कोटी होण्यास मदत होईल.
Press Note
No comments:
Post a Comment