Wednesday, 20 September 2017

स्वच्छता मतदान उपक्रमामध्ये आज 80 हजार विद्यार्थी मतदान करणार

       नागपूर, दि.20 :  स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून उद्या गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये स्वच्छता मतदान उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील 80 हजार विद्यार्थी स्वच्छता मतदान करणार असल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले.
            स्वच्छता ही सेवा अभियान जिल्हा परिषदेतर्फे 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून शालेय स्वच्छता व आरोग्य विषयाअंतर्गत स्वच्छता अभियान हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक 21 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील इयत्ता 1 ते 8 मधील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी मतदान मतपत्रिका तयार करण्यात आल्या असून शाळांमध्ये सकाळी 11 ते 2 या वेळेत मतदान होणार आहे. या उपक्रमात 80 हजार विद्यार्थी  स्वच्छता मतदानात सहभागी होऊन आपले मत नोंदवतील.
****


No comments:

Post a Comment