Wednesday, 6 September 2017

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ



मुंबई, दि. 6 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 6 नोव्हेंबर 2017 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या असून 11 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
            57 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 6 नोव्हेंबर2017 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 15 व्या बालनाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी 4 डिसेंबर 2017पासून एकूण पाच महसूली विभागात आयोजित करण्यात येणार आहे. हिंदीसंगीत आणि संस्कृत भाषेतील नाट्य स्पर्धा जानेवारी 2018 मध्ये आयोजित करण्यात येतील.
बालनाट्य वगळता इतर नाट्य स्पर्धेसाठी तीन हजार रुपये तसेच बालनाट्य स्पर्धेसाठी एक हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालकसांस्कृतिक कार्यमहाराष्ट्र राज्यमुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्य संस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिकानियम शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ‘नवीन संदेश’ या मथळ्याखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 11 सप्टेंबर ,2017 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.
1) मुंबईकोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालकसांस्कृतिक कार्यजुने सचिवालय,विस्तार भवनपहिला मजलामहात्मा गांधी मार्गमुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
2) पुणे महसूल विभागातील संस्थांनीसहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयबंगला क्रमांक-4विमानतळ रोडपुणे (020-20271301) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
3) औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालय,विभागीय कार्यालयरुम नंबर-02एमटीडीसी बिल्डिंगगोल्ड टॉकीजच्या समोरस्टेशन रोड,औंरगाबाद-431005 (0240-2339055) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
4) नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयद्वारा : अभिरक्षकमध्यवर्ती संग्रहालयअस्थायी प्रदर्शन हॉलतळमजला,सिव्हिल लाईननागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही,याची सर्व स्पर्धक संस्थांनी नोंद घ्यावी.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाहीतर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेसाठी संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईलअसे संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी कळविले आहे.
००००

No comments:

Post a Comment