मुंबई, दि. 6 : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेशऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सन 2017-18 पासून swayam.mahaonline.gov.in१ या संकेतस्थळावरुनराबविण्यात येत आहे. इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ फक्त 26 जुलै, 2017 नंतर इयत्ता 11 वीमध्ये प्रवेशघेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे निकाल अनुक्रमे दि. 27 जून व 17 जून रोजी जाहीरझाले आहेत. त्याअनुषंगाने ज्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाकरिता महाविद्यालयातप्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्जकरण्याची मुदत दि. 26 जुलै, 2017 पर्यंत ठेवली होती. दिनांक 26 जुलै, 2017 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी वरीलसंकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज भरले आहेत, अशा पात्र विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे वसतीगृहात रिक्त जागांवरप्रवेश देण्यात आलेला आहे.
तथापि, मुंबई विद्यापीठाच्या निकालास होत असलेला विलंब व काही शहरात इयत्ता 11 वी च्याप्रवेश फेऱ्या अद्याप सुरु असल्यामुळे तेथे इयत्ता 11 वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृहप्रवेशसाठी संकेतस्थळ बंद केले असल्यामुळे विद्यार्थी वसतीगृह प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दि. 26 जुलै 2017 नुसार इयत्ता 11 वी मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहेअशा विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता यावा म्हणून दि. 10 सप्टेंबर, 2017 पर्यंतमुदतवाढ देण्यात येत आहे.
ही मुदतवाढ फक्त 26 जुलै, 2017 नंतर इयत्ता 11 वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागूराहील. वसतीगृहातील यापूर्वी झालेले नवीन प्रवेश वगळता रिक्त असलेल्या उर्वरीत जागांवर गुणानुक्रमेप्रवेश देण्यात येईल याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन आयुक्त, आदिवासी विकास यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment