Wednesday, 20 September 2017

शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार



मुंबईदि: 20 : उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा महसूल मंत्री चंद्रकांत  पाटील यांच्या हस्ते काल राजा शिवाजी विद्या संकुल दादर येथे सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. पाटील म्हणालेवाढत्या आव्हानामुळे यापुढे शिक्षणात बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य संस्कार देणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्यांनीही आपले समाजाप्रती काही देणं आहेअशी भावना ठेवावीअसे ते म्हणाले.
यावेळी  राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेली अपूर्वा राजाध्यक्षद्वितीय आदित्य रानडे तसेच आय. ई. एस. वांद्रे पूर्व शाळेची विद्यार्थिनी यशस्वी ओरके हिच्यासह गुणवत्ता प्राप्त 185 विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास साठे विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.कविता रेगेसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वैद्यविश्वस्तविद्यार्थी,  पालक उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment