'वस्तू व सेवाकर' विषयी
राजीव जलोटा 'दिलखुलास'मध्ये
मुंबई, दि. २० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास ' कार्यक्रमात ‘वस्तू व सेवा कर' या विषयावर राज्याचे वस्तू व सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या गुरूवार दि. २१ आणि २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक दीपक वेलणकर यांनी घेतली आहे.
दि. १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात करण्यात आली आहे. वस्तू व सेवा कर आकारणी, सर्वसामान्यांचे वस्तू व सेवा कर विषयीचे प्रश्न, राज्यातील वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी आदी प्रश्नांची उत्तरे श्री. जलोटा यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment