मुंबई, दि. 18:मुंबईतील मेट्रो, बस,
रेल्वे, बेस्ट यासह इतर
प्रवासाच्यासाधनांद्वारे एकाच तिकीटावर प्रवास करता यावा यासाठी अभ्यास करावा तसेच
वाहतुकीच्या सर्व साधनांची एकत्रित माहिती असणारे उपयुक्त ॲप तयार करण्यात यावे,
असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगितले. फोर्ड कंपनीच्या
शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.त्यावेळी ते बोलत
होते. या शिष्टडळाने यावेळी ‘मोबाईल मुंबईकर’, व्हिजन डिजीटल ट्रान्स्पोर्टेशन
इकोसिस्टीम या विषयावर सादरीकरण केले.
मोबाईल तिकीट, जर्नी प्लॅनर, सिंगल जर्नी तिकीट, डिजीटल पेमेंट्ससह प्रत्यक्ष प्रवासाला लगणारा वेळ कळावा यासाठी वापरावे
लागणारे तंत्रज्ञान याविषयावर सादरीकरण करण्यात आले.फोर्ड कंपनी 115 वर्षांपासून
वाहन उद्योगात अग्रेसर असून वाहतुकीसाठीचे डिजीटल उपाययोजना करण्यातही कंपनीचे
योगदान आहे. सर्व अंतर्गत वाहतुकीसाठी वपराव्या लागणाऱ्या साधनांचा एकत्रित वापर
करण्यासाठी लागू करण्यासाठीच्या
प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी फोर्ड कंपनीची मदत घेतली जाणार आहे.
या बैठकीला एमएमआरडीएचे महानगर
आयुक्त यु. पी. एस मदान, अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे,महराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक
रणजीत सिंग देओल, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थीत
होते. तर, फोर्ड कंपनीचे आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे उपाध्यक्ष
जॉन लार्सन, आयटी उपाध्यक्ष रिचर्ड स्ट्रेडर,डिजिटल सेवेच्या उपाध्यक्ष लारा मर्लिंग,फोर्ड
स्मार्ट मोबिलीटी कंपनीचे भारतातील संचालक
महादेवन राममुर्ती, कार्यकारी संचालक मायकेल ब्रेल्मर
यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment