Thursday, 21 September 2017

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात अपर मुख्य सचिव एस.एस.संधू

       
मुंबईदि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या विषयावर सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री  वाहिनीवरून  प्रसारित होणार आहे. ही मुलाखत उद्या, शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी प्रसारित होणार आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
          शेतक-यांनी अर्ज सादर केल्यानंतर अर्जांची होणारी पडताळणीकर्जमाफीची प्रक्रिया,बँकानी जी  माहिती शासनाकडे सादर केली आहे, त्याची पडताळणी शासन कशी आणि कधी करणार आहे कर्जमाफीचा लाभ शासन शेतकऱ्यांना कसा देणार आहे या विषयी सविस्तर माहिती श्री. संधू यांनी 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment